अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:48 IST2018-03-26T22:48:04+5:302018-03-26T22:48:04+5:30
अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक व सिटू संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक व सिटू संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पदाधिकाºयांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली.
सरकारची हिटलरशाही चालणार नाही, मेस्मा कायदा रद्द करा, सेवानिवृत्त महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळालाच पाहिजे, अशी घोषणा महिलांनी दिल्या. आयटकचे देवराव चवळे यांनी सरकारच्या जन विरोधी धोरणावर भाषणातून जोरदार टीका केली. प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी महिला कर्मचाºयांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, रिक्त जागा तत्काळ भराव्यात, धनादेशाद्वारे व्यवहार करण्याचे बंधन रद्द करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी ललिता केदार, कौशल्या गौरकार, माया नैनुरवार, सुशीला कार, आशा कोटांगले, माया शेडमाके आदी महिला हजर होत्या.