श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतीदिनी आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:38 IST2018-11-24T23:37:53+5:302018-11-24T23:38:35+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी, गांधीवादी व विचारवंत आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृतीदिनानिमित्त रविवार २५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता पवनार येथील बाबूजी वाडीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतीदिनी आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, गांधीवादी व विचारवंत आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २१ व्या स्मृतीदिनानिमित्त रविवार २५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता पवनार येथील बाबूजी वाडीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
बाबूजी वाडीतील संकल्पस्थळी गुरूदेव प्रचारक बा. दे. हांडे यांच्या उपस्थितीत श्रद्धेय बाबूजींना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. शिवाय सर्वधर्मीय प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने होईल. या कार्यक्रमाला चाहत्यांसह लोकमत समुहाच्या एजंट, वार्ताहर, सखीमंच, युवानेक्स्ट सदस्य आणि मित्र परिवाराने उपस्थित राहण्याची विनंती ज्येष्ठ पत्रकार विनोद चोरडिया यांनी केली आहे.