शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्षांकडे शेखर शेंडे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते कायम आपल्या विरोधात काम करीत आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांचे पहिले राजीनामे घ्या; त्यांनी जर आपल्या विरोधात प्रचार केला तर आपण रणजित कांबळेंच्या विरोधात जाहीरपणे मंचावर जाऊन प्रचार करू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी दिला.यासंदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष डॉ.नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांनाही माहिती दिली आहे. वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.यापूर्वी दोन विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे गटाच्या लोकांनी आपल्याविरोधात जाहीर प्रचार केला व आपला पराभव केला. हीच पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता आहे. रणजित कांबळे समर्थक असलेले सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष तशी जाहीर वाच्यता करीत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात निवडणूक लढणे योग्य होणार नाही.त्यामुळे पक्षाने वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थक असलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन त्यांना कार्यमुक्त करावे; देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात जाहीररीत्या रणजित कांबळे यांच्या विरोधात सभा घेऊन प्रचार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता काँग्रेस या सदंर्भात काय निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.मागील दोन विधानसभा निवडणूकीत रणजीत कांबळे समर्थकांनी विरोधात काम केल्यामुळे आपण पराभूत झालो. आताही तीच वेळ येवू शकते. सेलूचे तालुकाध्यक्ष विजय जयस्वाल जाहिररीत्या आपले काम करणार नाही, असे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे कांबळे समर्थक सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घ्यावे, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे.- शेखर शेंडे,प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस.

टॅग्स :Ranjit Kambleरणजित कांबळे