हत्येच्या तपासासाठी पंतप्रधानांना निवेदन
By Admin | Updated: July 22, 2015 02:43 IST2015-07-22T02:43:44+5:302015-07-22T02:43:44+5:30
डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील सुत्रधार मिळाले नाही. प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवून एक वर्ष होत आहे;

हत्येच्या तपासासाठी पंतप्रधानांना निवेदन
धरणे आंदोलन : ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ अभियान
वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील सुत्रधार मिळाले नाही. प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवून एक वर्ष होत आहे; पण काहीही निष्पन्न झाले नाही. पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुरोगामी व परिवर्तनवादी संघटनांनी केली. यासाठी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.
दाभोळकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी दोन वर्षे होतात. तपास सीबीआयकडे देऊनही सुगावा लागला नाही. पानसरे यांची हत्या होऊन सहा महिने होत आहे. दोन्ही हत्यांमागे सारखेच प्रयत्न दिसतात; पण तपास पूढे गेला नाही. यामुळे निदर्शने, धरणे करून निवेदन देण्यात आले. २० जुलै ते २० आॅगस्ट पर्यंत ‘हिंसा के खिलाफ, मानवता कि ओर’ हे अभियान राबवून निषेध करण्यात येणार आहे. याची जिल्ह्यात सोमवारी सुरूवात झाली.
यावेळी गजेंद्र सुरकार, विजय आगलावे, दिलीप उटाणे, असलम पठाण, गुणवंत डकरे, प्रा. मेहरे, सलिम कुरेशी, तुंडलवार यासह पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)