२५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:57+5:30

पक्षीनिरीक्षणादरम्यान २५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. तलावावरील बंधाऱ्याच्या मातीच्या रस्त्यांवर छोटा तपकिरी होला आपले खाद्य शोधत होता. सकाळच्या न्याहारीची सुरूवात वेड्या राघूने ड्रॅगनफ्लाय पकडून केलेली दिसली. सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेणारा कंठवाला होला तारेवर बसला होता.

Report of more than 25 bird species | २५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद

२५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद

ठळक मुद्देपक्षीसप्ताह निमित्त रोठा तलावावर पक्षी निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. पक्षी निरीक्षण, संवर्धन यासंबंधी विविध उपक्रमांचे आयोजन विविध संस्थेद्वारा केल्या जात आहे. पक्षी, वन्यजीव व निसर्गाचे संरक्षण व संवर्धनात अग्रेसर असलेल्या बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने पाचव्या दिवशी रोठा क्रमांक २ या तलावावर पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षीनिरीक्षणादरम्यान २५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. तलावावरील बंधाऱ्याच्या मातीच्या रस्त्यांवर छोटा तपकिरी होला आपले खाद्य शोधत होता. सकाळच्या न्याहारीची सुरूवात वेड्या राघूने ड्रॅगनफ्लाय पकडून केलेली दिसली. सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेणारा कंठवाला होला तारेवर बसला होता. फार दूरून राखी तित्तिराचा आवाज ऐकू येत होता. लालबुड्या बुलबुल उगाच एका झाडावरून दुसºया झाडावर उडत होता. छोटा कंठेरी चिखल्या आपल्या जोडीदारासोबत तलावाजवळील चिखलात भक्ष शोधण्यात मग्न होता व यांच्यासोबत होती टीपकेवाली तुतारी. इतरत्र सामान्य तुतारीही होत्याच. मध्यम बगळा तलावाच्या काठावर अर्धवट पाय बुडतील इतक्या खोल पाण्यात भक्षांच्या शोधात फिरत होता व गाय बगळेही तलावाच्या काठावर दिसले. शिकारी पक्षी शिक्रा एका वाळलेल्या झाडावर भक्षाचा अंदाज घेत होता. पण त्याला कोतवाल पक्ष्यांच्या जोडीने हल्ला चढवत तिथून खदडून लावले. परिसरातील धोका टळला असे मानत कोतवाल जोडीने पुन्हा त्यांच्या घरट्या जवळील झाडांवर विसावा घेतला. शिक्रा आता तलावातील दुसºया किनाºयावर आपल्या आवाजाने उपस्थिती दर्शवित होता. सतत आवाज करणाऱ्या टिटव्यांनी त्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली होती. हळदीकुंकू बदक आकाशात उडत असतांना पक्षी निरीक्षक आपल्या कॅमेरात त्याला टिपत होते. दरम्यान स्थलांतरित बदकांचा थवा नजरेस पडला. पक्षी निरीक्षणासाठी बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखेडे, वन्यजीव अभ्यासक पराग दांडगे, वैभव देशमुख, पक्षी अभ्यासक राहुल वकारे, राजदीप राठोड व सुरभी विप्लव, दिपक गुढेकर, डॉ. सुप्रिया दांडगे, राजेंद्र लांबट, पार्थ वीरखडे, दीपक व देवाशिष साळवे, गजानन बर्वे, मोहन व राजस हांडे, पंकज वानखेडे, जिगीषा दांडगे, मिस्टी राठोड उपस्थित होते.

Web Title: Report of more than 25 bird species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.