स्वाईन फ्लू काढतोय डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:42 PM2019-03-26T23:42:24+5:302019-03-26T23:42:54+5:30

जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर आता स्वाईन फ्लू डोके वर काढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या आजाराची लागण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील दोघांचा तर वर्धा शहरातील एकाचा असा एकूण तिघांचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ..........

Removing the swine flu on the head | स्वाईन फ्लू काढतोय डोके वर

स्वाईन फ्लू काढतोय डोके वर

googlenewsNext
ठळक मुद्देआजाराला घाबरून न जाता सावधगिरी बाळगा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर आता स्वाईन फ्लू डोके वर काढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या आजाराची लागण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील दोघांचा तर वर्धा शहरातील एकाचा असा एकूण तिघांचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असला तरी जिल्ह्यात आॅल ईज वेल असल्याचे आरोग्य विभागाचे काही अधिकारी सांगतात. नागरिकांनीही सदर आजाराला घाबरून न जाता सदर आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून उपचार घेणे गरजेचे आहे.
प्राप्त माहितीनुसार, इन्फलुएंझा हा हवेवाटे व स्पर्शावाटे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. ताप, डोकेदुखी, घशात खवखवणे, अंगदुखी, सर्दी, क्वचीत जुलाब ही स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. रुग्ण शिंकल्यानंतर आणि खोकलल्यानंतर या आजाराचे विषाणू हवेत पसरतात.
त्यामुळे हा आजार इतरांनाही होण्याची शक्यता बळावते. तसा हा आजार सौम्य स्वरूपाचा असला तरी रक्तदाब, मधुमेह आणि स्थुलपणा असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करू शकतो. विशेष म्हणजे या आजारावर प्रभावी औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेळीच उपचार घेणे हे आजाराची लागण झालेल्या व्यक्तीसाठी फायद्याचे ठरते. वर्धा जिल्ह्यात सध्या स्वाईन फ्ल्यू हा आजार आपले पायमुळ घट्ट करू पाहात असून नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच आवाहन जि.प.च्या आरोग्य विभागाने केले आहे.

‘आॅसेलटूमीवीर’ ठरतेय प्रभावी
स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. सदर फ्लूची लक्षणे आढळल्यास दोन दिवसात आॅसेलटूमीवीर हे औषध सुरू केल्यास त्याचा चांगला फायदा रुग्ण बरा होण्यासाठी होत असल्याचे सांगण्यात येते.

स्वाईन फ्लू हा विषाणू जन्य आजार आहे. त्याची लक्षणे आढळल्यास रुग्णाने कुठलाही घरगुती उपाय न करता नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: Removing the swine flu on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.