फेरफार नसलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जास नकार
By Admin | Updated: August 6, 2014 23:58 IST2014-08-06T23:58:28+5:302014-08-06T23:58:28+5:30
फेरफार नमुना नसलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सपशेल नकार दिला जात आहे़ बँकांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे़ बँकांना निर्देश देत शेतकऱ्यांना कर्ज

फेरफार नसलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जास नकार
पवनार : फेरफार नमुना नसलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सपशेल नकार दिला जात आहे़ बँकांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे़ बँकांना निर्देश देत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे़
मौजा पवनारचा १९८८ च्या पूर्वीचा फेरफारचा तपशिल पटवारी व रेकार्ड रूम या दोन्ही ठिकाणी उपलब्ध नाही़ यामुळे १९८८ पूर्वी फेरफार झालेल्यांना सदर रेकार्ड मिळत नसल्याने त्यांना पीक कर्ज घेताना अडचणी निर्माण होत आहेत़ रेकार्ड उपलब्ध नसल्याबाबत तहसिलदारांचे प्रमाणपत्र देऊनही बँक व्यवस्थापक कर्ज देण्यास तयार नाही. कर्ज पाहिजे असल्यास वकिलामार्फत सर्च रिपोर्ट व गहाण खताची सक्ती केली जात आहे़ यासाठी ५० हजारांकरिता ५ ते ६ हजार रुपये खर्च येतो. एकीकडे शासन शेतकऱ्यांना वीज, पाणी देण्याचे धोरण आखते तर दुसरीकडे बँक व्यवस्थापन आठमुठे धोरण स्वीकारते़ यामुळे शेतकऱ्यांना सावकरांचा उंबरठा झिजवावा लागत आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)