शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष प्राधिकरणबाबत जिल्हा प्रशासन बेपर्वा

By admin | Updated: April 27, 2016 02:14 IST

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या संरक्षणाबाबत वर्धा जिल्हा चांगलाच बेपर्वा असल्याचे दिसून आले आहे.

धुऱ्याच्या आगीत झाडांची होरपळ : आठ वर्षांपासून समितीचे पुनर्गठन नाहीपराग मगर वर्धारस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या संरक्षणाबाबत वर्धा जिल्हा चांगलाच बेपर्वा असल्याचे दिसून आले आहे. या झाडांच्या संरक्षणाकरिता असलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीचे गत आठ वर्षांपासून गठनच झाले नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. झाडांबाबत प्रशासनाची उदासिनता एवढ्यावरच थांबली नाही तर या समितीबाबत पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या या समितीचे आठ वर्षांपूर्वी म्हणजेच सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेत गठन झाले होते. त्यानंतर या समितीचे कधी नूतनीकरणच झाले नाही. परिणामी जिल्ह्यात होत असलेल्या वृक्षतोडीकडे कुणाचे लक्ष नाही. झाडांच्या अस्तित्त्वाबाबत कोणीच गंभीर नाही. यामुळे वर्धेत ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश केवळ कागदावरच असल्याचे समोर येत आहे. वाढत्या तापमानापासून बचावाकरिता सर्वत्र वृक्षारोपणाचा संदेश देण्यात येतो. यावर अंमलबजावणी सुरू आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांकडून पेटविण्यात येत असलेल्या धुऱ्यांच्या आगीत मोठमोठी झाडे होरपळली जात आहे. याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेताच्या धुऱ्यावर अशी आग लावण्यावर प्रतिबंध घालण्याकरिता या समितीमार्फत काही ठोस नियम आखण्याची गरज आहे; मात्र जिल्ह्यात या समितीचे गठनच झाले नसल्याने जिल्ह्यात वृक्षलागवडीपेक्षा वृक्षतोडच अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात केवळ वर्धा नगरपरिषदेत मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी अशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती आहे. तीही निसर्ग सेवा समितीच्या पुढाकाराने अस्तित्त्वात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची उदासीनता प्रत्ययास येते. धुरा पेटविण्यात अनेक झाडांचा कोळसा उन्हाळवाही सुरू करताना शेतकरी त्यांच्या शेतात असलेला काडीकचरा पेटवितात. यात धुऱ्यावरील कचरा जाळण्याचीही पद्धत आहे. धुऱ्यावर लावण्यात आलेल्या आगीत अनेक मोठी वृक्ष जाळली जातात. यातील काही वृक्ष मुळातून पूर्णत: जळाली असून ती रस्त्यावर आडवी झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी वर्धा-नागपूर मार्गावर सेलू नजीक धुरा पेटविल्याने बुंध्यापासून जळालेले बाभळीचे झाड महामार्गावरच कोसळले. त्यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली. भर दुपारी हे झाड पडले. नेमक्या वेळी रस्त्यावर कुणी नसल्याने मोठा अपघात टळला. तसेच शुक्रवारी रात्री वर्धा पवनार मार्गावर एका शेतकऱ्याने धुरा पेटविल्याने संपूर्ण आग रस्त्यापर्यंत पोहोचली. धुरा पेटविताना पसरत गेलेल्या आगीतून अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या कडेला बाभूळ, आंबा आणि कडुलिंब अशी झाडे आढळतात. यातील आंबा आणि बाभूळ ही झाडे लवकरच पेट घेणारी आहेत. त्यातच आंब्याचे झाडे हे आतून पोकळ असते. त्यामुळे ही दोन्ही झाडे पेटायला हलकीशी आसही पुरते. शेतकऱ्यांनी हा प्रकार टाळावा याकरिता व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त आहे.