वृद्धाच्या डोळ्यांदेखत लालपरीने सहचारिणीस चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 05:00 AM2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:29+5:30

कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविंदराव ठाकरे (७५, रा. धाडी) हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. यादरम्यान कमलाबाई आर्वी आगारातील एमएच ४० - एन ८४२९ क्रमांकाच्या वर्धा-वरुड या एसटी बसच्या मागच्या चाकामध्ये आल्या. यात चिरडल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. 

The redhead crushed his companion in the old man's eyes | वृद्धाच्या डोळ्यांदेखत लालपरीने सहचारिणीस चिरडले

वृद्धाच्या डोळ्यांदेखत लालपरीने सहचारिणीस चिरडले

Next
ठळक मुद्देधाडीच्या बसथांब्यावरील अपघात : बँकेच्या कामाकरिता साहूरला जात होते दाम्पत्य

मंगेश ढवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
साहुर : वृद्धापकाळात पती-पत्नीच एकमेकांचा आधार असल्याने वृद्ध दाम्पत्य बँकेच्या कामानिमित्त सोबतीने निघाले होते. अशातच काळ बनून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने वृद्धाच्या डोळ्यांदेखत सहचारिणीस चिरडले. रस्त्यावर निपचित पडलेल्या आपल्या वृद्ध पत्नीला वाचविण्यासाठी वृद्धाने पूर्ण प्राण एकवटून मदतीची मागणी केली. लागलीच नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वृद्धेला रुग्णालयाकडे रवाना केले. पण, वाटेचत त्यांचा मृत्यू झाल्याने वृद्धाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना धाडी येथील बसथांब्यावर घडली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविंदराव ठाकरे (७५, रा. धाडी) हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. यादरम्यान कमलाबाई आर्वी आगारातील एमएच ४० - एन ८४२९ क्रमांकाच्या वर्धा-वरुड या एसटी बसच्या मागच्या चाकामध्ये आल्या. यात चिरडल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. 
डोळ्यांदेखत सहचारिणी रस्त्यावर तडफडत असताना पाहून गोविंदरावांचा गलबला सुरू झाला. मदतीसाठी त्यांनी थकलेल्या आवाजात टाहो फोडला. लागलीच समाजसेवक दिनेश लांडे, प्रशांत गावंडे, राहुल घोरमाडे, अनिल चोरे, देवराव भलावी व संदीप चोरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 
त्यांना धनराज गरजे यांच्या खासगी मिनीबसमध्ये टाकून वरुड येथील ग्रामीण रुग्णालयाकडे प्रवास सुरू केला. परंतु गंभीर दुखापत झाल्याने कमलाबाईंनी वाटेतच अखेरचा श्वास घेतला. या अपघाताने वृद्ध गोविंदराव यांचा वृद्धापकाळातील एकमेव आधार हिरावला आहे. अपघातानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेऊन आष्टी पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली. 
याप्रकरणी बसचालक अनिल उंदरे कारवाईच्या रडारवर असून, वृत्त लिहिस्तोवर आष्टी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नव्हती. या प्रकरणी पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे. 

धाडी बसस्थानकासमोर रस्ता दुभाजकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वारंवार अपघात घडल आहे.या सिमेंट मार्ग झाल्यामुळे वाहनेही सुसाट धावतात. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखण्याकरिता गतिरोधक देण्याची गरज आहे.
दिलीप भाकरे, सदस्य, ग्रा.पं. धाडी

 

Web Title: The redhead crushed his companion in the old man's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.