शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

रामनगरात पोलीस बंदोबस्तात रावणदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 6:00 AM

रामनगर भागातील चौपाटी मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित असल्याचे लक्षात येताच आदिवासी बांधवांनी एकत्र येत रामनगर भागातील चौपाटी मैदान गाठले. रावणदहनाचा विरोध करण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच सदर कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली. शिवाय विरोध दर्शविण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना रामनगर भागातील गर्जना चौकामध्ये अडविले.

ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी केला विरोध : परवानगी देणाऱ्यांच्या विरोधात रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थान राजा रावण असून त्यांचे आम्ही पूजन करतो. रुढी व परंपरेनुसार रावणदहन करणे हे चुकीचे असून होणारे रावणदहन थांबविण्यात यावे, अशी मागणी करीत मंगळवारी आदिवासी बांधवांनी रामनगर येथील चौपाटी मैदानावर धडक देत आपला रोष व्यक्त केला. आदिवासी बांधवांच्या या पवित्र्यामुळे परिसरात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीअंती रावणदहनाचा कार्यक्रम पार पडला.रामनगर भागातील चौपाटी मैदानावर गर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाही आयोजकांनी रितसर परवानगी घेत सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दसऱ्याच्या पूर्वी आदिवासी बांधवांनी राजा रावण हे आमचे दैवत असून त्याची आम्ही पूजा करीत असल्याने समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन कुठल्याही अधिकाऱ्याने रावणदहनाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. तसे निवेदनही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम होईल येथे आम्ही त्या कार्यक्रमाला विरोध करू असेही निवेदनातून स्पष्ट केले होते.रामनगर भागातील चौपाटी मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित असल्याचे लक्षात येताच आदिवासी बांधवांनी एकत्र येत रामनगर भागातील चौपाटी मैदान गाठले. रावणदहनाचा विरोध करण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच सदर कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली. शिवाय विरोध दर्शविण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना रामनगर भागातील गर्जना चौकामध्ये अडविले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांकडून रितसर परवानगी असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना दिली. सदर घटनेमुळे परिसरात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात रामनगर येथे रावणदहनाचा कार्यक्रम पार पडला.चौपाटी मैदानाला आले होते पोलीस छावणीचे स्वरूपरावणदहन कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रामनगर भागातील चौपाटी मैदान परिसरात पोलिसांच्या तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. रावणदहन कार्यक्रमाला विरोध दर्शविण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच रामनगरचे ठाणेदार धनाजी जळत हे त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक, सीआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी पोलिसांच्या बंदोबस्तामुळे रामनगर भागातील चौपाटी मैदानाला पोलीस छावणीचेच स्वरूप आले होते.रामनगर भागातील चौपाटी मैदानावर आयोजित रावणदहन कार्यक्रमाला रितसर परवानगी देण्यात आली. रावणदहन कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर परवानगी देताना उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमस्थळी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Dasaraदसरा