गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या रणरागिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:52+5:30

लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून त्यांच्याकडून धान्यसाठा व इतर साहित्य आणि पैसे गोळा करून या संकटकाळात सापडलेल्या गरजूंसाठी त्यांनी भोजनदान प्रकल्प सुरू केला आहे.

Ranaragini rushed to help the needy | गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या रणरागिणी

गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या रणरागिणी

ठळक मुद्देभोजनदानातून दातृत्त्व : प्रेरणादायी उपक्रम, २0 दिवसांपासून पुरविताहेत अन्नधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : सर्वसामान्य कुटूंबातील समाजकार्याचे व्रत स्वीकारलेल्या महिलांं मागील २० दिवसांपासून विविध परिसरातील गरजूंना भोजनदान करीत प्रेरणादायी उपक्रम राबवित आहे.
लॉकडाऊनमुळे मजूर वर्ग कामावर जाऊ शकत नसल्याने हातावर पोट असणारे, दिव्यांग, निराधार नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक दायित्व म्हणून शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील महिलांनी शासनाची कुठलीही मदत न घेता स्वत:च्या परिचयांना एकत्र करून त्यांच्याकडून धान्यसाठा व इतर साहित्य आणि पैसे गोळा करून या संकटकाळात सापडलेल्या गरजूंसाठी त्यांनी भोजनदान प्रकल्प सुरू केला आहे. मास्टर कॉलनी येथील समन्वयक बुद्ध विहार जवळ सीमा राष्ट्रपाल मेश्राम यांच्या घरी मागील वीस दिवसांपासून दररोज ४०० ते ५०० व्यक्तींकरीता जेवण तयार केले जात आहे. हे जेवण संत कबीर काजी वॉर्ड, फुले वॉर्ड, खंडोबा वॉर्ड, गौतम वॉर्ड आदी ठिकाणी दररोज सकाळी ते दुपारी दोन वाजेपर्यंत गरजूंना वाटप करण्यात येत आहे. तर गरजू, वृद्ध व दिव्यांगांना त्यांच्या घरपोच जेवणाचे पाकिट पोहचविले जात आहे.
यासाठी मंडळाच्या सीमा मेश्राम, शिला बोरकर, निर्मला भोंगाडे, यमुना गायकवाड, जयश्री देवगडे, लीना फुलझेले, गीता गाठले, शबा सय्यद, सुमन सहारे, कल्पना शेंडे, मनीषा खेळकर, रजनी जमगडे, सुजाता सहारे, मोना फुलझेले, राजश्री बांबोडे, शुभांगी पाटील, शारदा पाटील, वीणा पाटील, अश्विनी मेंढळकर, राशी मेश्राम, श्रेया देवगडे, सहर्षा बोरकर आदींसह प्रत्येक वॉर्डातील स्वयंसेवक, कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळत आहे. रणरागिणींच्या या कार्याला नागरिकांनी सलाम केला असून त्यांना गावातील नागरिकांकडूनही दाद मिळत आहे.

Web Title: Ranaragini rushed to help the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.