जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

By अभिनय खोपडे | Updated: April 7, 2023 18:05 IST2023-04-07T18:05:20+5:302023-04-07T18:05:26+5:30

सेलू  तालुक्यातील सोंडी गावानजीक असलेल्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला.

Rain everywhere in the district, bull died due to lightning | जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

वर्धा :  सेलू  तालुक्यातील सोंडी गावानजीक असलेल्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. दुपारी ३ वाजता वादळ आले त्यात विजांचा कडकडाट झाला शेतात वीज पडल्याने  सुनील केशव कोडापे  यांच्या मालकीचा असलेला बैल मृत्यू पावला अंदाजे २५ हजार रुपयाचा असलेला बैल मृत्य पावल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जनांसह सर्वदूर पाऊस झाला वाढत्या उकाड्यातून या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात काही भागात उभा असलेल्या गहू पिकाचे  पावसामुळे नुकसान झाले तर भाजीपाला पिकालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक बाजार समितीमध्ये उघड्यावर असलेले धान्य झाकण्यासाठी तारांबळ उडाली.

Web Title: Rain everywhere in the district, bull died due to lightning