वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:50+5:30
वादळी वाऱ्यामुळे शेतातील गोठे आणि घरांची पडझड झाली. जनावरांसाठी सहा महिने पुरेल एवढ्या वैरणाची व्यवस्था करून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांजवळ असणारा चारा शेतातच ओलाचिंब झाल्याने वैरणाचे संकट ओढवले आहे. गोठ्यांची डागडुजी करण्यात व्यस्त शेतकºयांना रात्रीच्या वेळी येणाऱ्या वादळामुळे जीव मुठीत धरून बसावे लागत आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : प्रखर उष्णतामानाच्या मे महिन्यात सातत्याने येत असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळित होत आहे. उन्हाळवाही पूर्णत: नाहीशी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे शेतातील गोठे आणि घरांची पडझड झाली. जनावरांसाठी सहा महिने पुरेल एवढ्या वैरणाची व्यवस्था करून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांजवळ असणारा चारा शेतातच ओलाचिंब झाल्याने वैरणाचे संकट ओढवले आहे. गोठ्यांची डागडुजी करण्यात व्यस्त शेतकºयांना रात्रीच्या वेळी येणाऱ्या वादळामुळे जीव मुठीत धरून बसावे लागत आहे. खरिपाची तयारी म्हणून शेतकऱ्यांनी शेताचे सपाटीकरण केले आहे. मात्र, पाऊस येत असल्याने नांगरणी केलेल्या शेतात रण वाढणार आहे. त्यासाठी पुन्हा नांगरणीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. जमिनीची धूप झाली नसल्याने खरीप हंगामात पीक उतारा देईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वादळामुळे विजेच्या तुटलेल्या तारा व खांबाची दुरस्ती सुरू असली तरी दर दिवसाआड येत असलेल्या वादळाने पुन्हा जैसे थे स्थिती होत आहे. शेतीकामात अडथळा येत आहे. पेरणीवेळी करावी लागणारी जांभूळवाही आताच करावी, का असा प्रश्न उभा ठाकत आहे. या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा अधिक होणार असल्याचे बोलले जात असल्याने या पिकाच्या पेरणीला अजून एक महिन्याचा वेळ आहे. अशात केलेली उन्हाळवाही येणाऱ्या पावसामुळे नेस्तनाबुत झाल्याने शेतकऱ्यांना दुबार खर्चाला सामोरे जावे लागणार आहे.