शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक झाले ‘क्लिन’

By admin | Updated: February 26, 2017 00:56 IST

बसस्थानक आणि रेल्वे स्थानक ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असतात. या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे असते;

अभिनव उपक्रम : पथनाट्यातून रेल्वे प्रवाशांत जागृती वर्धा : बसस्थानक आणि रेल्वे स्थानक ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असतात. या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे असते; पण प्रवाशांकडून विविध प्रकारचा कचरा होत असतो. हा कचरा साफ करून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वर्धा रेल्वे स्थानक क्लिन केले. सोबतच पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. हा अभिनव उपक्रम पाहून रेल्वे प्रवाशांनाही हायसे वाटले. गुरूवारी शहरातील रेल्वे स्थानकावर संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ वर्धा सुंदर वर्धा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला, युवतींनी फलाट धुवून तथा रेल्वे स्थानकावरील रंगलेल्या भिंती पुसून फलाटावर साचलेली घाण दूर केली. फलाटावरील प्रत्येक बाक, रंगलेला खांब, बापुकूटीची प्रतिकृती असलेल्या परिसरात रंगलेल्या भिंती साफ करीत घाण स्वच्छ केली. संपूर्ण फलाट झाडून स्वच्छ करण्यात आला. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक ते चारवर हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे २० ते ३० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ केला. शिवाय मुख्य तिकीट घराच्या भिंती, काचाही स्वच्छ करण्यात आल्यात. दरम्यान, फाऊंडेशनमध्ये सहभागी विद्यार्थी, युवकांनी फलाट क्रमांक एकवर स्वच्छतेबाबत पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून रेल्वे प्रशावांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली. शिवाय रेल्वे प्रवाशांकडून स्वच्छता राखण्याबाबत वचनही घेण्यात आले. रेल्वे स्थानकावर सादर होत असलेले पथनाट्य पाहून प्रवासीही थांबून बोध घेत होते. रेल्वेस्थानकावर गुरूवारी सकाळपासून सुरू असलेला हा उपक्रम प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होता. या उपक्रमातून स्वच्छतेबाबत जनजागृती तर झालीच, शिवाय रेल्वेस्थानकही ‘क्लिन’ झाले.(कार्यालय प्रतिनिधी)