गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनीस डावलले
By Admin | Updated: June 21, 2014 01:57 IST2014-06-21T01:57:00+5:302014-06-21T01:57:00+5:30
रंगलाल केजडीवाल हायस्कूलच्या शिक्षकांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत..

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनीस डावलले
पुलगाव : रंगलाल केजडीवाल हायस्कूलच्या शिक्षकांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थिनीला डावलून त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या अन्यायामुळे तिला मनस्ताप सहन करावा लागला़ या प्रकरणी पालकांनी प्राचार्यांना न्याय मागितला.
साक्षी मनोहर डगवार ही बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतून ८६.६२ टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आली. याबद्दल सामाजिक संघटनांनी तिच्या घरी जाऊन कुटुंबीयांसह तिचा गौरव केला; पण शाळा व्यवस्थापनाने तिच्यापेक्षा कमी म्हणजे ८६ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी साक्षीचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही़ यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला़ या अन्यायाबद्दल चुकीची दुरूस्ती करून शाळेने विद्यार्थिनीस न्याय द्यावा, अशी मागणी पालकांनी लेखी तक्रारीतून शाळेच्या प्राचार्यांकडे केली आहे. अलिकडेच दहाव्या वर्गात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास बारावीच्या परीक्षेस बसविल्याचे प्रकरण संस्थेच्या अंगलट आले होते. एका प्रकरणी संस्थेस आर्थिक दंड भरावा लागला. महात्मा गांधी जयंती उत्सव शहरात चर्चेचा विषय ठरला होता. शाळा तासिका संपण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरी जातात. काही वर्गांना मान्यताच नाही; पण शिक्षक एकमेकांकडे बोट दाखवून बचाव करताना दिसतात. या गलथान कारभारामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत़ साक्षी ही गरीब असल्याने तिच्यावर अन्याय केल्याचे पालकांनी म्हटले आहे.(शहर प्रतिनिधी)