शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी चणा खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:51 IST

रबी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चण्याची लागवड केली. काही भागात कालव्याचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना घेता आले. त्यामुळे त्यांना चण्याचे पीक घेणे सोईचे झाले. चण्याच्या मळणीनंतर अनेक शेतकरी सध्या बाजार पेठेत चणा विक्रीकरिता नेत आहेत.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : रबी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चण्याची लागवड केली. काही भागात कालव्याचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना घेता आले. त्यामुळे त्यांना चण्याचे पीक घेणे सोईचे झाले. चण्याच्या मळणीनंतर अनेक शेतकरी सध्या बाजार पेठेत चणा विक्रीकरिता नेत आहेत. त्यांना योग्य भाव मिळावा या हेतूने देवळी तालुक्यातील नाफेडची चण्याची खरेदी सुरू करण्यात यावी, अशा सूचना आ. रणजीत कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिल्यात.बाजारभाव व नाफेडच्या दरात फार तफावत आहे. नाफेडकडून चण्याला दिला जाणारा भाव शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात समाधानकारक आहे. देवळी तालुक्यात पुलगाव व देवळी येथे नाफेडची खरेदी केंद्र असल्याने तेथे चण्याची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी, असेही यावेळी आ. कांबळे म्हणाले.नाफेडला चण्याची विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोदणी बंधनकारक आहे. देवळी तालुक्यात सुमारे १ हजार २०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, पावसाळा तोंडावर असून अद्यापही खरेदी सुरू झालेली नाही. शेतीच्या कामाची लगबग सुरू झाल्यावर पेरणीच्या कामाला शेतकरी प्रथम प्राधान्य देतात. अशावेळी चण्याच्या विक्रीसाठी न्यायचा की शेतीची कामे हा संभ्रम निर्माण होईल. तरी शेतकरी वर्गाची अडचण लक्षात घेता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाफेडने चण्याची खरेदी करावी व तशा सूचना आपण त्यांना द्याव्या, असे यावेळी आ. कांबळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ranjit Kambaleरणजित कांबळे