‘रुंद वरंबा सरी’ पद्धतीने होणार कडधान्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:19+5:30
शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच नव्हे तर सदर योजना वर्धा जिल्ह्यात किती हेक्टवर राबविण्यात यावी यासाठीचे उद्दिष्टही कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.

‘रुंद वरंबा सरी’ पद्धतीने होणार कडधान्याची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्प खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय सुरक्षा कडधान्य अभियान अंतर्गत रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने जिल्ह्यातील काही भागात यंदा कडधान्याची लागवड होणार आहे. शासनाच्या या योजनेच्या जास्तीत जास्त शेतकरी गटांनी लाभ घ्यावा, यासाठी सध्या कृषी विभागाने कंबर कसली असून सध्या गावागावात जाऊन कृषी विभागाचे अधिकारी या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना समजवित आहेत.
शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच नव्हे तर सदर योजना वर्धा जिल्ह्यात किती हेक्टवर राबविण्यात यावी यासाठीचे उद्दिष्टही कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासह जास्तीत जास्त शेतकरी गटांना या योजनेचा फायदा देण्यासाठी सध्या कृषी विभागाकडून प्रयत्न होत आहेत.
वर्धा जिल्ह्याला सलग तूर गट प्रात्येक्षिक १०० हेक्टर, सोयाबीन अधिक तूर असे आंतर पीक ६०० हेक्टर तर खरीप ज्वारी नंतर चणा पीक पद्धतीवर आधारीत यासाठी ८० हेक्टरचे उद्दिष्ट यंदा मिळाले आहे. त्यासाठी अनुक्रमे १२.५० क्विंटल तूर, ३० क्विंटल तूर व ४५० क्विंटल सोयाबीन तसेच ५ क्विंटल तुरीचे बियाणे जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाले असून ते तालुकास्तरावर पोहोचविण्यात आले आहे.
वायफड येथे पार पडले प्रात्यक्षिक
वर्धा तालुक्यातील वायफड येथे भावी युवा शेतकरी गटाला कृषी विभागामार्फत बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय तुषार घायवट यांच्या शेतात सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने कशी लागवड करायची याचे प्रात्यक्षिक शेतकºयांना करून दाखविण्यात आले. सदर प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी पी. ए. घायतिडक, एस. एस. धुमणे आदींची उपस्थिती होती.
किडीचा प्रादुर्भाव झाल्यास अनुदान
रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड केलेल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकºयाला एकरी २४५ रुपये अनुदान किटकनाशक खरेदी करण्यासाठी दिले जाते. तर निंबोळी अर्क तयार करण्यासाठी एकरी १०० रुपये अनुदान दिले जाते.
असे आहे प्रोत्साहनपर अनुदान
रुंद वरंबा सरी पद्धतीने पीक लागवड केलेल्या शेतकºयाला एकरी २०० ते ५०० रुपये अनुदान मिळते. आंतर पीक घेणाºयाला २०० तर सलग तूर पीक घेणाºयाला एकरी ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जात आहे.