शनिवारपर्यंत प्राथमिक शिक्षकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करा
By Admin | Updated: May 31, 2014 00:06 IST2014-05-31T00:06:37+5:302014-05-31T00:06:37+5:30
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेची प्रारूप यादी शनिवारी (ता. ३१) पर्यंत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी प्राथमिक शिक्षण

शनिवारपर्यंत प्राथमिक शिक्षकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करा
वर्धा : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेची प्रारूप यादी शनिवारी (ता. ३१) पर्यंत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पत्रकातून दिली.
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निवारणासंबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेत आणि शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी शिक्षक समितीने उपस्थित केलेल्या मुद्दांवर निर्धारित वेळेवर कार्यवाहीचे निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी दिले. १९९0 नंतर सेवेत आलेल्या स्थायी करण्याबाबत १५ जून पर्यंंत कार्यवाही करण्यात यावी, अंशदायी पेंशन हिशेब करावे, परताव्याच्या रकमा भविष्य निर्वाह खात्यात वर्ग कराव्यात, भविष्य निर्वाह निधीचे २0१२-१३ चे वितरण पत्र जून अखेरपर्यंत शिक्षकांना मिळावे. पात्र शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्याचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे, गत तीन वर्षातील गोपनीय अहवालाच्या साक्षांकित छायाप्रती शिक्षकांना विनाविलंब उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षकांची बिंदुनामावली अद्यावत करावी, आयकर २४ क्यूची कार्यवाही, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, दुय्यम सेवापुस्तकांचे अद्यावतीकरण, शंकर जोगे, दुर्योधन कांबळे यांची वेतन थकबाकी, हिरा येसकर यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लावण्याची कार्यवाही विनाविलंब करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत शिकणार्या विद्यार्थ्यांंना इंग्रजी माध्यमाच्या गणित, विज्ञान विषयाच्या स्वाध्याय पुस्तिकांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले. या बैठकीला वरिष्ठ लेखा अधिकारी ओव्हळ, शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय शिरभाते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशोक वासनिक, विलास भगत, अशोक पवार, कनिष्ठ सहायक घोटकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळात राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, नागपूर विभाग प्रमुख नरेश गेडे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर, समुद्रपूर शाखेचे अध्यक्ष शीतल बाळसराफ, वर्धा शाखेचे सचिव श्रीकांत अहेरराव यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)