कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा

By Admin | Updated: July 25, 2015 02:23 IST2015-07-25T02:23:57+5:302015-07-25T02:23:57+5:30

कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. कायदेविषयक लोकशिक्षण समाजामध्ये प्रसारीत व्हावे यासाठी उच्च न्यायालयाद्वारे जागोजागी कायदेविषयक शिबिर घेण्यात येते.

Public participation in law enforcement matters | कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा

कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा

एन. व्ही. बन्सल : फिरते लोकन्यायालयात कायदेविषयक शिबिर
सेलू : कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. कायदेविषयक लोकशिक्षण समाजामध्ये प्रसारीत व्हावे यासाठी उच्च न्यायालयाद्वारे जागोजागी कायदेविषयक शिबिर घेण्यात येते. प्रत्येकाला कायद्याचे आवश्यकतेपुरते ज्ञान, आपले अधिकार व कर्तव्याची माहिती असली पाहिजे. जेणेकरुन हितांचे रक्षण करता येईल. प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे, अधिकाराप्रती जागृत राहावे, असे आवाहन विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश एन.व्ही. बन्सल यांनी केले.
दिवाणी व फौजदारी न्यायालय, अंतर्गत खडकी, हमदापूर व हिंगणी येथे फिरते लोकन्यायालय व शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी न्यायाधीश सु.वि. चरडे, बार असोसिएशनचे राठी, अ‍ॅड.पाटील, अ‍ॅड. मगरे, अ‍ॅड. नामदेव गव्हाळे उपस्थित होते.
याप्रसंगी अ‍ॅड. गव्हाळे यांनी वाहतूक नियम, शिक्षणाचा अधिकार, ग्राहकांचे अधिकार, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, गर्भलिंग निवड प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आर.एम. बुंदेले यांनी उपजत मृत्यू अधिनियम, जलजन्य आजार, किटकजन्य आजारबाबत माहिती दिली. याप्रसंगी न्यायालयाचे सहायक अधीक्षक किटे, मोरे, साटोणे, धुर्वे, पिंपरकर, दुर्गे, मिश्रा, सोनपितळे, सूर्यवंशी, पाटील, रहानगडाले यासह आदींनी शिबिराकरिता सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Public participation in law enforcement matters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.