शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सिंदीत रस्त्यावर उतरला जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM

सदर मोर्चाच्या माध्यमातून सिंदीकरांनी हिंगणघाट येथील घटनेचा निषेध नोंदविला. जुन्या पोलीस स्टेशनच्या मैदानातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सहा. पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांना सादर केले.

ठळक मुद्देवायगाव, गिरड, अल्लीपूर कडकडीत बंद : विक्की उर्फ विकेश नगराळेला फासावर लटकविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : हिंगणघाट येथील घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ सिंदी (रेल्वे) येथे आज बंद पाळून शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंदमुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.सदर मोर्चाच्या माध्यमातून सिंदीकरांनी हिंगणघाट येथील घटनेचा निषेध नोंदविला. जुन्या पोलीस स्टेशनच्या मैदानातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सहा. पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांना सादर केले. हिंगणघाट येथे घडलेला प्रकार निंदनिय आहे. शिवाय त्यामुळे शांतीप्रिय जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्येक महिलेमध्ये सध्या असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. शिवाय सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.क्रूर मानसिकतेच्या व्यक्तींना धडा शिकविण्यासाठी कायद्यात सुधारणा करून कठोर कायदा करण्यात यावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मोर्चात नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, केसरीमल नगर कनिष्ठ महाविद्यालय, विजय विद्यालय, नगर परिषदच्या संपूर्ण प्राथमिक शाळा, गुंज कॉव्हेंट, प्रगती कॉव्हेंट, शहरातील व्यापारी, सामाजिक संघटनांचे आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष सुनीता कलोडे, शालिनी मुडे, आशिष देवतळे, उपाध्यक्षा वंदना डकरे, गंगाधर कलोडे, सुधाकर खेडकर, बबनराव हिंगणेकर, ओमप्रकाश राठी, नगरसेविका पुष्पा सिरसे, वंदना सेलूकर, बबिता तुमाणे, वनिता मदनकर, सुमन पाटील, अमोल बोगाडे, विलास तळवेकर, रमेश उईके, प्रकाश मेंढे, अकिल शेख, सुधाकर वलके, शालिकराम जोशी, अशोक कलोडे, मुन्ना शुक्ला, बाबाराव सोनटक्के, रवी राणा, प्रवीण सिर्शिकार, किशोर भांदकर, गुल्लू भंसाली, रवी वाघमारे, रामेश्वर घंगारे, फिरोज बेरा, रामवतार तुरक्याल, कान्हाजी झाडे, तुषार हिंगणेकर, कैलास पालिवाल, अमोल गवळी, पंकज पराते, अफझल बोरा, रवी अवचट, स्नेहल कलोडे, बबलू गवळी, सुधाकर घवघव, धमेंद्र बडवाईक, निळकंठ घवघवे, घनश्याम मेंढे, संजय तडस, वसंता सिरसे, धीरज लेंडे, गजानन खंडाळे, सुनील शेंडे, जगदीश बोरकुटे, इकबाल भाईजी, हंसराज बेलखोडे, सुरज आस्तानकर, अशोक सातपुते, मुन्ना पालिवाल, यशवंत बडवाईक, दामा झिलपे, प्रकाश सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.सिंदी (रेल्वे) च्या व्यापाऱ्यांनी दुकाने ठेवली बंदहिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ शहरातील बाजारपेठ बुधवारी बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन दोषीवर कठोर कारवाईच्या मागणीला दुजोरा दिला. इतकेच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, मनसे, आरपीआय, वंचित बहूजन आघाडी, जनता दरबार संघटना, प्रवाशी मित्र मंडळ आदींनी हिंगणघाट येथील घटनेचा निषेध नोंदवित आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांसह ठाणेदारांना सादर केले.अनेकांनी व्यक्त केल्या भावनामोर्चाच्या समारोपीय प्रसंगी माजी नगराध्यक्षा शालिनी मुडे, माजी नगराध्यक्षा सुनीता कलोडे, बबनराव हिंगणेकर, सुधाकर खेडकर, आशिष देवतळे, विद्यार्थिनी पलक खान, नौशाद सूर्या, अंकिता बारई, कांचन वरजे आदींनी मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी