शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात सामान्यांची हेळसांड

By admin | Updated: June 16, 2014 23:39 IST

तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शासकीय यंत्रनेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांचे शासकीय कामकाज वेळेवर होत नाही. नागरिकांना आपले कामे करून घेण्यासाठी शासकीय

दारोडा : तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शासकीय यंत्रनेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांचे शासकीय कामकाज वेळेवर होत नाही. नागरिकांना आपले कामे करून घेण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामध्ये श्रम, वेळ, पैसा, खर्र्च होऊन सुद्धा सामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. हा प्रकार हिंगणघाटमधील पंचायत समितीमध्ये नियमित घडत असल्याचे नागरिक सांगत आहे. सामान्य नागरिकांना विविध शासकीय कामकाजासाठी नेहमीच तहसील कार्यालये, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय जि.प. कृषी विभाग यासह अनेक शासकीय कार्यालयांशी संबंध येतो. शासकीय कार्यालयात असलेले अधिकारी व कर्मचारी हे जनतेचे सेवक असल्यामुळे त्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे अपेक्षित वेळेत सौजन्यपूर्वक करून देणे आवश्यक आहे. असे असतानाही नागरिकांना कामासाठी उंबरठे झिजविल्याशिवाय पर्यायच राहत नाही. काही ठिकाणी अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयातच राहत नाही. अशा वेळेस नागरिकांना नाहक मनस्ताप वाढत जातो. जर एखाद्या वेळेस अधिकारी कर्मचारी भेटले तर काम होईलच याची शास्वती फार कमी असते. शासनाने शेतकऱ्यांसाठी गत दोन वर्षांपूर्वी सातबारा मध्ये असलेली शेतजमीन भोगवटदार वर्ग दोन मधील असेल तर ती एक मध्ये करून घेण्याचे काम तलाठ्याकडे सोपविले. हे काम विनामूल्य करायचे होते. परंतु या कामासाठी अनेकांजवळून ३०० रुपये घेतल्याचेही शेतकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि इतरही नागरिकांची लूट सुरू आहे. नियमानुसार कुठलीही कामे वेळेत होत नसल्याचा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे तरी वरिष्ठांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)