पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती

By Admin | Updated: August 27, 2015 02:20 IST2015-08-27T02:20:15+5:302015-08-27T02:20:15+5:30

नेहरू युवा केंद्र व लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती करण्यात आली.

Public awareness through Renaissance yatra | पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती

पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती

शासकीय योजनांची दिली माहिती : सामाजिक कुप्रथांवर केला हल्ला
समुद्रपूर : नेहरू युवा केंद्र व लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, परडा येथून यात्रेची सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी यात्रा तसेच रॅली काढून माहिती पुस्तिकाचे वितरण केले.
यावेळी अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी व गावकरी मंडळ, सरपंच यांच्याकडून गावातील माहितीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी शासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. यानंतर युवा संसद घेऊन युवकांसोबत चर्चा केली. चर्चासत्रात नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर शेंडे यांनी मार्गदर्शन केले. आभार नेत्रा धोटे यांनी मानले. यावेळी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.
पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक समस्यांबाबत जागृती केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अर्जुन महाकाळकर, लोकजागृती बहुउद्देशीय संस्थेचे सहसचिव नारायण मुंगले, पद्माकर बोलवटकर, अशोक महाराज उरकुडे, मारोतराव तडस, विठ्ठल चंदनखेडे उपस्थित होते. मान्यवरांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
नेहरू युवा केंद्र कार्यकर्त्यांनी पथनाट्यांच्या स्वरूपात गावकऱ्यांना शौचालयाचा वापर करावा, स्त्री भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, लेक वाचवा अभियान या सामाजिक विषयांवर जागृती करून स्वच्छ भारत मिशन व जन-धन योजना या शासकीय योजनांची माहिती देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक तपासे यांनी केले. यावेळी देशभक्ती गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल मुंगले, महेश घुमडे, नितेश महाकाळकर, करिश्मा अडसड, पणु ठाकरे, प्रीती कोल्हे, प्रफुल कोल्हे, भारत भेंडे, प्रमोद तराळे, प्रफुल बुटे, रवि आसोले, रामकृष्ण नंदुरकर, विष्णु कारमोरे, प्रफुल मेहत्रे, आकाशे तपासे, गजानन बारई यांनी सहकार्य केले. यावेळी गावकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Public awareness through Renaissance yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.