‘थ्री फेज’ वीजपुरवठा दिवसा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:27+5:30
वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.

‘थ्री फेज’ वीजपुरवठा दिवसा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : रबी हंगाम सुरू झाल्यामुळे चणा, गहू तसेच खरिपातील कपाशी, तूर पिकांना ओलित सुरू झाले आहे. याकरिता वीज वितरण कंपनीने दिवसालाच कृषिपंपाकरिता वीजपुरवठा करावा , अशी चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव, सोनेगाव (आ.), दहेगाव, केळापूर सह परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.
तीन दिवस रात्री १० वाजतानंतर वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती असते.
रात्री जिवावर उदार होऊनच पिकांना ओलित करावे लागते, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. ओलिताच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने सातही दिवस दिवसाच वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
रात्रीच्या वेळेला सरपटणाऱ्या तथा वन्यप्राण्यांचा शेतात मुक्त संचालन असल्यामुळे जिवाला धोका असते. अणि थंडीमुळे आजारी पडण्याची शक्यता असतो.
- मनीष येणकर, शेतकरी जामणी.
वीज वितरणचा दुजाभाव
घोराड - बागायती तालुका असलेल्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांप्रति वीज वितरण दुजाभाव करीत असून तालुक्यातील काही शेतकºयांकरिता त्रासदायक ठरत आहे. तरी वीज वितरण कंपनीने हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी होत आहे.
सेलू तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांना कृषिपंपाचा थ्री फेज वीज पुरवठा निरंतर २४ तास दिला जातो, तर काही शेतकºयांना सिंगल फेजचा सामना करावा लागत आहे. त्यात आठवड्यातून चार दिवस रात्री-अपरात्री कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकºयांना ओलितासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हा दुजाभाव का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
सेलू तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सेलू येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी पुढाकार घेऊन करीत असलेले कार्य पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा २४ तास किंवा दिवसा निरंतर वीज पुरवठा देऊन शेतकऱ्यांप्रति असलेला वीज वितरणचा दुजाभाव दूर करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.