शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण द्या
By Admin | Updated: August 22, 2014 00:03 IST2014-08-22T00:03:41+5:302014-08-22T00:03:41+5:30
कर्मचारी संघ मान्यतेमधील त्रुट्या दूर करून नियुक्त सर्व शिक्षण सेवक व कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी जि़ प़ शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तक्रार निवारण

शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण द्या
वर्धा : कर्मचारी संघ मान्यतेमधील त्रुट्या दूर करून नियुक्त सर्व शिक्षण सेवक व कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी जि़ प़ शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तक्रार निवारण समितीद्वारे ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले़
कर्मचारी संघ मान्यतेतील त्रुट्या दूर करून सर्व शिक्षण सेवक व कर्माऱ्यांना संवा संरक्षण द्या, तात्काळ वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, २ मे २०१२ पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या व २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना २० जून २०१४ शासन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता देण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनाद्वारे लावून धरणयत आल्या़
२० जूनच्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करून वैयक्तिक मान्यता प्रकरणे निकाली काढणे व नियुक्त शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण देण्याबाबत शिक्षण उपसंचालक यांनाही निवेदन देण्यात आले आहे़ धरणे आंदोलनात अजय भोयर, रमेश टपाले, प्रा. नरेंद्र थुटे, मनोहर वाके, देविदास गावंडे, अशोक किनगावकर, अनिल टोपले, दीपक कदम, मोहम्मद आरीफ, मोहन गाडे, योगेश्वर भोमले, रवींद्र डफ, विनय मुलकलवार, प्रकाश डुबे, रहिम शहा, पल्लवी वखरे आदींनी सहभाग घेतला़(कार्यालय प्रतिनिधी)