तत्पर वीजसेवेसाठी स्वतंत्र सबस्टेशन द्या
By Admin | Updated: July 27, 2014 00:14 IST2014-07-27T00:14:45+5:302014-07-27T00:14:45+5:30
सद्यपरिस्थितीत विद्युत वितरण कंपनीने कारंजा शहर व इतर १५ गावांना मिळून विद्युत सेवा देण्याकरिता कारंजा सबस्टेशन दिलेले आहे. पण कामाचा व्याप, गावांची संख्या आणि वाढती वीज

तत्पर वीजसेवेसाठी स्वतंत्र सबस्टेशन द्या
कारंजा(घा.) : सद्यपरिस्थितीत विद्युत वितरण कंपनीने कारंजा शहर व इतर १५ गावांना मिळून विद्युत सेवा देण्याकरिता कारंजा सबस्टेशन दिलेले आहे. पण कामाचा व्याप, गावांची संख्या आणि वाढती वीज मागणी लक्षात घेता कारंजा शहराकरिता एक स्वतंत्र सबस्टेशन तर इतर १५ गावाकरिता दुसरे स्वतंत्र सबस्टेशन देण्यात यावे, अशी मागणी कारंजावासीनी तालुका ग्राहक पंचायत मार्फत संबंधितांकडे केली आहे.
इंदिरा नगर परिसरात असलेल्या कारंजा सबस्टेशनला सध्या कारंजा या १५ हजार लोकसंख्येच्या गावासह नारा, आजनादेवी, सावरडोह, बेलगाव, खापरी, वाघोडा, तरोडा, काकडा, परसोडी, बिहाडी, मदनी, खैरी, सेलगाव(लवणे), चंदेवानी, गोदनी अशी पंधरा गावे जोडलेली आहे. कारंजा शहरात ४ हजार विद्युत ग्राहक व १०० कृषी ग्राहक आहेत. त्याचप्रमाणे १५ गावात सुद्धा ४ हजार ५०० विद्युत ग्राहक आणि १०० कृषी ग्राहक आहे. एवढ्या ८ हजार ५०० विद्युत ग्राहक आणि २०० कृषी ग्राहकांचा कारभार सांभाळणे आणि तत्पर सेवा देणे उपअभियंता आणि कर्मचाऱ्यांना कठीण जात आहे.
कारंजा शहरात पोलीस स्टेशन, तीन कॉलेज, पाच शाळा, दवाखाना, तहसील, कृषी विभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ अशी महत्त्वाची कार्यालये आहे. या सर्व कार्यालयाना तत्पर व सलग विद्युत सेवा देणे गरजेचे असते.
ही सेवा एकच सबस्टेशन, कामाचा व्याप व ग्राहकांची वाढती संख्या यामुळे योग्य प्रकारे देता येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कमी असल्यामुळे हाब त्रास होत आहे. या दृष्टीने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)