सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजारांची आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:02+5:30
सततच्या पावसामुळे, पडलेल्या धुक्यांमुळे तसेच खोडकिडीच्या रोगामुळे आणि सदोष बियाण्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगाच न लागल्याने लावलेला खर्च व्यर्थ गेला. सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी आतापर्यंत हेकटरी ४० हजाराहुन अधिकचा खर्च आला. मात्र, संपूळे पीक उद्धवस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात खचून गेला आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजारांची आर्थिक मदत द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीड लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली. मात्र, सततच्या पावसाने आणि नापिकीने संपूर्ण पिके नष्ट झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ४० हजार रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी किसान अधिकार अभियानने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सततच्या पावसामुळे, पडलेल्या धुक्यांमुळे तसेच खोडकिडीच्या रोगामुळे आणि सदोष बियाण्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगाच न लागल्याने लावलेला खर्च व्यर्थ गेला. सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी आतापर्यंत हेकटरी ४० हजाराहुन अधिकचा खर्च आला. मात्र, संपूळे पीक उद्धवस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात खचून गेला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करावे, सर्व पंचनामे राज्य व केंद्र शासनाला पाठवावे, राज्य व केंद्र शासनाने संयुक्तपणे नुकसानीची भरपाई म्हणून ४० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, पुढील एका महिन्यांचा आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. आंदोलनात अविनाश काकडे, सुदाम पवार, गोपाळ दुधाने, प्रफुल्ल कुकडे, विठ्ठल गुजरकर, रामु गायकवाड, गोविंदा पेटकर, नारायण कोल्हे, सुनिल चलाख, उज्ज्वल चांदेकर, किशोर हनुवंते, एकनाथ बरबडीकर, कन्हैय्या छांगानी, अॅड. कपीलवृक्ष गोडघाटे उपस्थित होते.