शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

हल्लेखोरांपासून डॉक्टरांना सुरक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 9:39 PM

देशभरात सर्वत्र रुग्णालय किंवा डॉक्टरांवर असामाजिक तत्त्वांकडून भ्याड हल्ले केले जात आहे. यामुळे रुग्णालयाचे नुकसान होते तसेच डॉक्टरांवरही आर्थिक व मानसिक दडपण येत असल्याने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याकरिता काठोर कायदा तयार करुन झिरो टॉलरन्स पॉलिसी तयार करावी आणि सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आली.

ठळक मुद्दे‘आयएमए’ची मागणी : पाळला निषेध दिन, जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात सर्वत्र रुग्णालय किंवा डॉक्टरांवर असामाजिक तत्त्वांकडून भ्याड हल्ले केले जात आहे. यामुळे रुग्णालयाचे नुकसान होते तसेच डॉक्टरांवरही आर्थिक व मानसिक दडपण येत असल्याने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याकरिता काठोर कायदा तयार करुन झिरो टॉलरन्स पॉलिसी तयार करावी आणि सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी आज निषेध दिन पाळून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तरुण डॉक्टरवर हल्ला करुन गंभीर मारहाण करण्यात आली. डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा वातावरणात रुग्णांवर, विशेषत: गंभीर रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर मंडळी नेहमीच दडपणात असतात. याचा परिणाम रुग्णसेवेवर व एकंदरीत सामाजिक आरोग्यावर पडत आहे. त्यामुळे केंंद्र शासनाने अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी कठोर कायदा करावा. झिरो टॉलरंन्स पॉलिसी आणून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. हॉस्पिटल व नर्सिंग होम हे विशेष विभाग म्हणून घोषित करावे व सरकारने परिणामकारक सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आज निषेध दिन पाळून हाता काळी पट्टीबांधून काम केले. निवेदन देताना आयएमएचे अध्यक्षडॉ. संजय मोगरे, उपाध्यक्ष डॉ. जयंत मकरंदे, सचिव डॉ. विपीन राऊत, डॉ. डी. बी. पुनसे, डॉ. रेखा रायझादा, डॉ. शंतनू भोयर, डॉ. रजेंद्र डागा, डॉ. प्रदीप सुने, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. विवेक चकोले, डॉ.अभिजीत खनके, डॉ. संजय घाटे, डॉ. शिरिष वैद्य, डॉ. सचिन पावडे, डॉ. सचिन तोटे, डॉ.अशोक जैन, डॉ. सुहास जाजू, डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. अदलखिया यांच्यासह आयएमएचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :doctorडॉक्टर