कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:15 IST2018-01-02T23:15:37+5:302018-01-02T23:15:56+5:30
कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.

कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले.
वर्धा शहरात आंबेडकरी जनतेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी कोरेगाव भीमा येथील घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करून संबंधितांवर भादंविच्या ३०२ कलम व पूर्व नियोजित हत्येचा कट रचल्याबाबत गुन्हा दाखल करावा. शिवाय आरोपीवर अॅक्ट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य विजय आगलावे, निरज गुजर, शारदा झामरे, अॅड. हर्षवर्धन गोडघाटे, अतुल दिवे, मयुर डफळे, विशाल रामटेके आदींची उपस्थिती होती.
बसपाच्यावतीने निवेदन
बहूजन समाज पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यात कोरेगाव भीमा येथील दगडफेक, जाळपोळ व भीमसैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आहे. तसेच दोषींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनोमदर्शी भैसारे, भास्कर राऊत, मेजर विजय ढोबळे, ओमप्रकाश भालेराव, दीपक भगत, मनिष फुसाटे, सुरेश नगराळे, दिनेश वाणी, पुरुषोत्तम लोहकरे, जयंत वासनीक, विवेक गवळी, शालिक गवळी, अॅड. अभिषेक रामटेके, धम्मा तेलंग, अजय मुन, वसंत डंभारे, सचिन शंभरकर आदी उपस्थित होते.