जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या कृषी व्यावसायिकांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:19+5:30

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी थेट कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांसह कृषी केंद्र व्यावसायिक मनोज भुतडा, रवी बन्नोरे, बिसानी यांच्याची संवाद साधला. शिवाय विदर्भ अ‍ॅग्रो या कृषी केंद्रासह सुमारे आठ कृषी केंद्रांची पाहणी केली.

Problems of agronomists known to the Collector | जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या कृषी व्यावसायिकांच्या समस्या

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या कृषी व्यावसायिकांच्या समस्या

ठळक मुद्देस्टॉक बुकाची तपासणी। बियाण्यांचा तुटवडा जाणवेल काय?

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठ गाठून तेथील कृषी केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी केंद्र व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. शिवाय यंदा बियाण्यांचा तुटवडा जाणवणार काय, याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. याप्रसंगी कृषी विभागाचे मंडळ अधिकारी पी. ए. घायतिडक यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी थेट कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांसह कृषी केंद्र व्यावसायिक मनोज भुतडा, रवी बन्नोरे, बिसानी यांच्याची संवाद साधला. शिवाय विदर्भ अ‍ॅग्रो या कृषी केंद्रासह सुमारे आठ कृषी केंद्रांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कृषी केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत काय, खत व बियाणे यांचा तुटवडा आहे काय, यंदा शेतकऱ्यांकडून कुठल्या पिकाच्या बियाण्यांची मागणी जास्त आहे, आदी विषयाची माहिती जाणून घेतली.
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सध्या शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांमध्ये येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कृषी केंद्र जास्त वेळ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी कृषी केंद्र व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Web Title: Problems of agronomists known to the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.