नाल्यावरील पुलावर सरंक्षण भिंत तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:00 IST2018-01-08T00:00:05+5:302018-01-08T00:00:17+5:30

येथील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर सरंक्षण भिंत नसल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधितांनी सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

Prepare a protective wall on the bridge over the Nala | नाल्यावरील पुलावर सरंक्षण भिंत तयार करा

नाल्यावरील पुलावर सरंक्षण भिंत तयार करा

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : अनुचित घटनेची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : येथील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर सरंक्षण भिंत नसल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधितांनी सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
इतरांच्या जीवितास धोकादायक ठरणाऱ्या नाल्यावरील पुलावरून वॉर्ड क्रं. १, ८, १०, ११, व १२ येथील नागरिकांना नेहमीच ये-जा करावी लागते. इतकेच नव्हे तर या मार्गाने विद्यार्थीही नेहमीच ये-जा करतात. छोटे-छोटे मुल-मुली येथून ये-जा करीत असल्याने व या पुलावर नेहमीच वर्दळ राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
संभाव्य धोका व नागरिकांची समस्या लक्षात घेता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी अशी मागणी नगरसेवक आशीष अंड्रस्कर, सरीता लोहकरे यांनी केली आहे.

Web Title: Prepare a protective wall on the bridge over the Nala