अवकाळी पावसाचा १२६ गावांना जबर फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:34+5:30
इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. तर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आर्वी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील काही भागात गारपीट झाले. यामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४० हेक्टर वरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ११ हजार ५०० हेक्टरवरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा १२६ गावांना जबर फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील आठवड्यात थंडीचा जोर कायम राहत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. याच पावसाचा जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांना चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसाने सुमारे २ हजार ३०८ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली असून कपाशीचे सर्वाधिक नुकसान केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. शिवाय तसा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. तर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आर्वी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील काही भागात गारपीट झाले. यामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४० हेक्टर वरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ११ हजार ५०० हेक्टरवरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. तर १५ हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्केच्या आत तसेच ४,३०० हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. १२ हेक्टरवरील चणा पिकाचे ३३ टक्क्यांच्या आत तर १,१०० हेक्टर वरील चणा पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. ५ हेक्टरवरील गहू पिकाचे ३३ टक्क्यांच्या आत तर ७०० हेक्टर वरील गहू पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. १२५ हेक्टर पिकावरील फळ पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ३२५ हेक्टरवरील फळ पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. १० हेक्टरवरील भाजीपाला वर्गीय पिकाचे ३३ टक्केच्या आत तर १४० हेक्टरवरील भाजीपाला वर्गीय पिकांचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्त शेतकºयांना कुठलाही नियम व अटी लागू न करता शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
आर्वी तालुक्यात सर्वाधिक नुकसान
अवकाळी पावसामुळे वर्धा तालुक्यातील ८७४ हेक्टर, आर्वी तालुक्यातील १८,००० हेक्टर, कारंजा (घा.) तालुक्यातील १८८ हेक्टरवरील पिकाचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. असे असले तरी सेलू, देवळी, आष्टी (श.), हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील उभ्या पिकाचे कुठलेही नुकसान झाले नसल्याची नोंद कृषी विभागाने प्राथमिक अहवालात घेतली असून ज्या शेतकºयाचे नुकसान झाले असेल अशांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.