कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गार्इंचे वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:19 IST2019-01-30T00:19:01+5:302019-01-30T00:19:24+5:30
तालुक्यातील वायगाव (गोंड) येथून दहा गायी वाहनात कोंंबून कत्तलीकरिता नेत होते. याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी वाहन अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे दहाही गायींची सुखरुप सुटका झाली.

कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गार्इंचे वाचविले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर: तालुक्यातील वायगाव (गोंड) येथून दहा गायी वाहनात कोंंबून कत्तलीकरिता नेत होते. याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी वाहन अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे दहाही गायींची सुखरुप सुटका झाली.
वायगांव (गोंड) येथून एम.एच. १७ ए.जि. १०६४ क्रमांकाच्या वाहनात गायींना कोंबून कत्तलीकरिता नेत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर बजरंग दलाचे कार्यकर्के सतिश ठाकरे, महेंद्र झाडे, राजेश भुरे, शुभम व इतरांनी वाहन अडविले. वाहन चालकाने लगेच उडी घेऊन पोबारा केला. कार्यकर्त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १० गायी गुदमरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानी लगेच समुद्रपूर पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात प्रमोद हरणखेडे, विनायक गोडे व सुनिल शर्मा करीत आहे.