सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:16 IST2017-11-09T00:16:00+5:302017-11-09T00:16:12+5:30
महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे.

सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महावितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाºया वेळापत्रकात बदल केला. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना ऐन ओलिताच्या हंगामात संकटांना समोर जावे लागत आहे. यामुळे पिकांच्या सिंचनाकरिता दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शिवसेना, शेतकºयांनी केली. याबाबत बुधवारी महावितरणचे अभियंता सदावर्ते यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना तालुका प्रमुख गणेश इखार व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांच्या ओलित व अन्य समस्या लक्षात घेत महावितरणला निवेदन देण्यात आले. ऐन थंडीच्या दिवसात रात्री ११ वाजता वीज पुरवठा सुरू होत असल्याने ओलित करताना अनेक संकटांना समोर जावे लागत आहे. अनेक शेतकºयांची प्रकृती खालावली असून जंगली जनावरे तथा विषारी साप, विंचू आदी प्राण्यांपासून शेतकरी व शेतमजुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत शेतातील वीज पुरवठा असलेले वेळापत्रक तीन दिवस सकाळी व चार दिवस सायंकाळी, असे आहे. हे वेळापत्रक शेतकºयांकरिता योग्य नसून अडचणीत आणखी भर टाकणारे आहे. यामुळे तूर, गहू, चना, कापूस आदी नगदी पिके घेता येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या समस्या लक्षात घेत वेळापत्रकात योग्य तो बदल करावा व दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिवसेना, शेतकºयांनी रोषही व्यक्त केला.
निवेदन देताना प्रकाश खेकडे, निलेश वैद्य, श्याम शेंडे, सचिन पाटील, गजानन झाडे, विनोद आदमने, दिलीप राऊत, विनायक राऊत, सुरेश नन्नुरे, प्रशांत वैद्य, गजानन नन्नुरे, प्रमोद नागतोडे, बाबाराव खेकडे, धनंजय पाटील, मारोतराव नन्नुरे, विजय काकरवाल, रमेश काकरवाल, रमेश नाईक, सुरेश पंधराम, संदीप ठाकरे, पप्पू नाईक, अमोल भोयर, पांडुरंग उईके, श्याम नन्नुरे, गुलाब सिंग, सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.