पावर ग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्याची दमदाटी
By Admin | Updated: September 1, 2014 23:48 IST2014-09-01T23:48:10+5:302014-09-01T23:48:10+5:30
तालुक्यातील सोनेगाव टेकडी (रीठी) येथील शेत सर्व्हे नं. १२५ मध्ये पावर ग्रीड कंपनीने टावर उभा केला. हा टॉवर उभा करताना शेतकऱ्याला १५ लाख रुपये मोबदला देण्यात येईल असे सांगितले होते.

पावर ग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्याची दमदाटी
समुद्रपूर : तालुक्यातील सोनेगाव टेकडी (रीठी) येथील शेत सर्व्हे नं. १२५ मध्ये पावर ग्रीड कंपनीने टावर उभा केला. हा टॉवर उभा करताना शेतकऱ्याला १५ लाख रुपये मोबदला देण्यात येईल असे सांगितले होते. अद्याप २ लाख ५० हजार रुपये देण्यात आले. उर्वरीत रक्कम मागण्याकरिता जमीन मालक कंपनीकडे गेला असता त्याला दमदाटी करण्यात आली. यामुळे जमीन मालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
हरिओम शिवभक्ती पांचवा धाम सोनेगाव टेकडी(रिठी) यांच्या मालकीच्या जागेवर देवळी येथील अधिकाऱ्यांनी विद्युत टर्निंग टावर उभा केला. त्याचा मोबदला रुपये १५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. आजपर्यंत मात्र त्याचा मोबदला केवळ २ लाख ५० हजार रुपयेच अदा करण्यात आले. उर्वरित रक्कम मागण्यासाठी अनेक प्रकारची विनवणी हरिओम शिवभक्ती पांचवा धाम सोनेगाव टेकडी (रिठी)चे अध्यक्ष नरेश दिवाकर येळमुळे यांनी केली; परंतु मागणीला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. उलट या त्यांना दमदाटी करून कोणताही अधिकारी आमचे काहीही करू शकत नाही असे उलट उत्तर दिले. या बाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, एसडीओ हिंगणघाट यांच्यासह समुद्रपूर तहसीलदार यांना सादर करून कारवाईची मागणी केली आहे.(ताुलका प्रतिनिधी)