उड्डाण पुलावरील खड्डे ताबडतोड बुजवा
By Admin | Updated: December 9, 2014 22:56 IST2014-12-09T22:56:16+5:302014-12-09T22:56:16+5:30
शहरातील मुख्य चौक असलेल्या बजाज चौकातील उड्डाण पुलावर व चौकात मोठेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याने ते तात्ळाळ बुजवावे अशी मागणी अखिल

उड्डाण पुलावरील खड्डे ताबडतोड बुजवा
वर्धा : शहरातील मुख्य चौक असलेल्या बजाज चौकातील उड्डाण पुलावर व चौकात मोठेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याने ते तात्ळाळ बुजवावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
बजाज चौक हा शहरातील महत्त्वाचा चौक आहे. या चौकाला लागूनच रेल्वे उड्डाण पूल आहे. आजघडीला हा उड्डाण पूल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय लहान झाला आहे. दिवसातून हजारो वाहने या चौकातून हिंगणघाट, यवतमाळ, नागपूर अशा सर्वत्र ठिकाणी वाहने याच चौकातून जात असतात. तसेच शहरातील महत्त्वाचे भाजी मार्केटही याच चौकात आहे. या चौकात खड्ड्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन दररोज अपघात घडत आहे.
तसेच उड्डाण पुलावर दिवसातून तीन ते चार वेळा चक्का जाम होत आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करणारे नागरिक त्रासून गेले आहेत. तसेच शाळा महाविद्यालयातील मुले दररोज सायकलने शाळेत जातात तेव्हा खड्ड्यामुळे सतत पडत असतात. त्यामुळे दुरुस्ती ताबडतोब करण्यात यावी, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी गाढे यांना करण्यात आली. निवेदन देताना शिष्टमंडळात परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हाध्यक्ष नीळकंठ पिसे, संजय ठाकरे, संजय भगत, अनिरुद्ध गवई, संजय मस्के, पुंडलिक नागतोडे, केशव तितरे, प्रदीप देशकर, निळकंठ राऊत, नामदेव गुजरकर, मनोहर गायकवाड, चरण खैरकार, विनोद पांडे, श्रीकांत हरणे, ज्ञानेश्वर कन्हेरी, विजय कांबळे, स्वप्नील पिसे, अरुण हस्ती, अभय पुसदकर, स्वप्नील पट्टेवार उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)