रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण
By Admin | Updated: October 15, 2014 23:22 IST2014-10-15T23:22:42+5:302014-10-15T23:22:42+5:30
शहरासह ग्रामीण भागातही सध्या रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. एकीकडे गोरगरिबांना स्वयंपाकासाठी व दिव्यांसाठी रॉकेल मिळत नसताना वाहनांमध्ये मात्र रॉकेलचा सर्रास वापर सुरू आहे.

रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण
वर्धा : शहरासह ग्रामीण भागातही सध्या रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. एकीकडे गोरगरिबांना स्वयंपाकासाठी व दिव्यांसाठी रॉकेल मिळत नसताना वाहनांमध्ये मात्र रॉकेलचा सर्रास वापर सुरू आहे. यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
सर्वसामान्य व गोरगरिबांसाठी परवानाधारक विक्रेते हे रॉकेल काळ्याबाजारात जास्त दराने विकत आहे. स्वत:चा आर्थिक फायदा करण्याच्या प्रयत्नात हजारो नागरिकांचे आरोग्य मात्र प्रदूषणामुळे बिघडत आहे. शहरासह ग्रामीण भागातही रॉकलवर मोठ्या प्रमाणात वाहने चालत आहे. विशेषत: प्रवासी वाहनांमध्ये अशा प्रकारचे रॉकेल वापरण्यात येत आहे. रॉकेलवर चालणाऱ्या वाहनातून निघणारा धूर हा आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अशा धुरामुळे विविध प्रकारचे आजार जडतात. परंतु त्याचा विचार करायला कुणाकडेही सध्या वेळ असल्याचे दिसत नाही. अशा वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. लाभार्थ्यांच्या हक्काचे रॉकेल काळ्या बाजारात विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडे पर्याप्त वेळ नाही. त्यामुळे हा भोंगळपणा दिवसेंदिवस वाढतच आहे.
२० रूपये लिटरचे रॉकेल ४० ते ४५ रूपये लिटर दराने काळयाबाजारात विकण्यात येत आहे. याबाबत एखाद्याने अशा रॉकेल विक्रेत्याची तक्रार केल्यावरही अशा तक्रारींची दखलच घेण्यात येत नसल्याने अशा विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे.(शहर प्रतिनिधी)