गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:17 IST2018-03-08T00:17:31+5:302018-03-08T00:17:31+5:30

आंजी पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खात्रिदायक माहितीच्या आधारे मदन धरण परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर........

 Police raids on dawn brawl | गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

ऑनलाईन लोकमत
आकोली : आंजी पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खात्रिदायक माहितीच्या आधारे मदन धरण परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर छापा टाकून दारूसह दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले.
त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई केली. दारूची विक्री करताना दिलीप कालूचंद रंगारी रा. म्हाडा कॉलनी वर्धा याला रंगेहात पकडण्यात आले. तर पांडुरंग पाटील हा घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलीप रंगारी याचे कडून ४ हजार ७०० रूपयाची २३ लिटर गावठी दारू जप्त केली तर पांडुरंग पाटील याच्या मालकीची ७ हजार ३०० रूपयाची गावठी दारू जप्त केली. ही कारवाई प्रभारी चौकी प्रमुख ओमप्रकाश इंगोले, जमादार दिनेश गायकवाड, शिपाई प्रितम इंगळे यांनी केली.

Web Title:  Police raids on dawn brawl