दुचाकीच्या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी

By Admin | Updated: May 24, 2017 00:59 IST2017-05-24T00:59:55+5:302017-05-24T00:59:55+5:30

गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी कर्तव्य आटोपून दुचाकीने गावी जात होते.

Police personnel injured in two-wheeler accident | दुचाकीच्या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी

दुचाकीच्या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर/गिरड : गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी कर्तव्य आटोपून दुचाकीने गावी जात होते. दरम्यान, त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास धोंडगाव वळणावर घडला. गजानन घोडे (३८), असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सोमवारी रात्री गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत गजानन घोडे हे आपले काम आटोपून एमएच ३२ एडी ९०४० क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाट येथे जात होते. दरम्यान, धोंडगाव वळणावर दुचाकीच्या समोर आलेल्या डुकराला धडक बसली. यात ते रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. मागाहून येणाऱ्या सहकारी प्रशांत ठोंबरे यांना घोडे हे पडून दिसताच त्यांनी त्यांना समुद्रपूर रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम व नंतर सांवगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.
 

Web Title: Police personnel injured in two-wheeler accident