जिल्हा कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: August 14, 2014 23:51 IST2014-08-14T23:51:30+5:302014-08-14T23:51:30+5:30
क्षुल्लक कारणावरुन पाच कैद्यांनी मिळून एका पोलीस शिपायाला मारहाण केली. यामध्ये सदर पोलीस शिपायाचा पोशाखही फाटला. ही घटना वर्धेतील जिल्हा कारागृहात गुुरवारी सकाळी ९

जिल्हा कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
पाच जणांवर गुन्हे : कारागृह प्रशासनात खळबळ
वर्धा : क्षुल्लक कारणावरुन पाच कैद्यांनी मिळून एका पोलीस शिपायाला मारहाण केली. यामध्ये सदर पोलीस शिपायाचा पोशाखही फाटला. ही घटना वर्धेतील जिल्हा कारागृहात गुुरवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पाचही कैद्यांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृह अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्व कैदी त्यांच्या बॅरेकमध्ये आहेत अथवा नाही याची शहानिशा करण्यासाठी पोलीस कर्मचारी विठ्ठल उगले (४४) गेले. दरम्यान, कारागृहात कैदी म्हणून असलेले सचीन श्रीवास्तव, मनीष डहरवाल, निलेश डहरवाल, महोम्मद सलिम वल्द अब्दुल व दिलीप उर्फ सनी उमेश सराटे हे पाच जण आपल्या बॅरेकमध्ये नव्हते. सदर शिपायाने शोध घेतला असता हे पाचही जण दुसऱ्या बॅरेकसमोर फिरत असल्याचे दिसून आले. यावरून शिपाई उगले याने त्यांना हटकले. या क्षुल्लक कारणावरुन त्या कैद्यांनी शिपायाशी वाद घातला. अंगावर धावत जावून शिपायाचा पोशाख फाडला. प्रकरण इथेच न थांबता त्या पाचणी जणांनी मिळून पोलीस शिपायाला मारहाण केली. या प्रकरणी त्या पाचही कैद्यांविरुद्ध शहर ठाण्यात कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४५, १४७, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्याते आले. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)