शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

मोहनच्या थापांपुढे पोलीस हैराण

By admin | Updated: August 19, 2015 02:18 IST

चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून तिचे तुकडे करणारा मोहन वरठी पोलिसांना चांगलाच फिरवित आहे.

वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून तिचे तुकडे करणारा मोहन वरठी पोलिसांना चांगलाच फिरवित आहे. त्याला विचारणा करण्यात येत असून तो घटनास्थळ दाखविण्याच्या नावावर केवळ सैर करीत असल्याचे दिसून आले आहे. मोहनला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून विचारणा सुरू आहे; मात्र त्याच्याकडून आवश्यक असलेली माहिती वदविने सेवाग्राम पोलिसांना शक्य झाले नसल्याचे दिसते. मोहनकडून हत्येच्या कबुली व्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच आले नाही. त्याने मंगलाची हत्या कुठे केली, शिवाय त्याच्या सांगण्यानुसार हत्येकरिता वापरलेली कुऱ्हाड त्याने कुठे ठेवली, हत्येच्या वेळी तो एकटा होता वा त्याच्या सोबत आणखी कोणी होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून काढण्यास पोलीस असमर्थ ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडून तपासात काही उघड करणे सेवाग्राम पोलिसांना अवघड होत असल्यामुळे या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सहभागी करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यात घडलेल्या मोठमोठ्या गुन्ह्याचा उलगडा करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही सध्या तरी या प्रकरणात यश आले नसल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळ दाखविण्याच्या नावावर मोहन केवळ पोलिसांच्या वाहनात फिरून सैर करीत असल्याचे दिसत आहे. त्याच्याकडून हत्येच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात वर्धा पोलीस सध्या तरी अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहे. मोहन याने ज्या पद्धतीने मंगलाची हत्या केली यावरून तो किती क्रूर व निगरगट्ट असावा याचा अंदाज पोलिसांना आला आहे. अशात त्याच्याकडून कुठलीही माहिती मिळत नसल्याने पोलिसांच्या तपासात सध्या तरी काहीच हाती नसल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)