दहेगावच्या ठाणेदाराने तक्रारकर्त्यास बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:47+5:30

प्राप्त माहितीनुसार, हेलोडी गावात सकाळी ११ वाजताच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून दोन महिलांचा वाद झाला. त्यातील एक महिला दहेगाव पोलिसात तक्रार देण्यास गेली असता ठाणेदार थोरात यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. याची माहिती महिलेचा भाऊ विजय राऊत यांना मिळाली. त्यांनीही गावातील काही नागरिकांना घेत पोलीस ठाणे गाठले.

The police constable of Dahegaon reprimanded the complainant | दहेगावच्या ठाणेदाराने तक्रारकर्त्यास बदडले

दहेगावच्या ठाणेदाराने तक्रारकर्त्यास बदडले

ठळक मुद्देव्हिडिओ व्हायरल : तक्रार घेण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोणतीही चूक नसताना विनाकारण युवकावर खोटे गुन्हे दाखल करीत दहेगाव (गोसावी) पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब थोरात यांनी पट्ट्याने मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विजय बबन राऊत रा. हेलोडी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हेलोडी गावात सकाळी ११ वाजताच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून दोन महिलांचा वाद झाला. त्यातील एक महिला दहेगाव पोलिसात तक्रार देण्यास गेली असता ठाणेदार थोरात यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.
याची माहिती महिलेचा भाऊ विजय राऊत यांना मिळाली. त्यांनीही गावातील काही नागरिकांना घेत पोलीस ठाणे गाठले. नागरिकांनी ठाणेदारांना तक्रार का घेत नाही, अशी विचारणा केली असता संतापलेल्या ठाणेदारांनी तुम्ही विचारणारे कोण, असे म्हणत शिवीगाळ करणे सुरू केले. तसेच विशाल चिंचोळकर याला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केली. ठाणेदारांनी विशालवर खोटे गुन्हे दाखल करीत पदाचा दुरुपयोग केला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी विजय राऊत याने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याप्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

याप्रकरणात यापूर्वी सोमवारी तक्रार घेण्यात आली होती. ज्यांच्या विरोधात तक्रार होती त्यांचीही तक्रार नोंदविण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा तक्रार प्राप्त झाली. याप्रकरणाशी ज्याचा संबंध नव्हता, तो पोलीस ठाण्यात येवून अरेरावी करीत होता. त्याला समजावून सांगत ठाण्यातून बाहेर जाण्यास सांगितले. पण, त्याने माझ्याशी वाद करून धक्काबुक्की केली. त्यामुळे त्याच्यावर ३५३,१८६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- बाळासाहेब थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहेगाव.

Web Title: The police constable of Dahegaon reprimanded the complainant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस