नागपूरातील दारूविक्रेत्यांना कारसह अटक

By Admin | Updated: February 27, 2015 00:02 IST2015-02-27T00:02:33+5:302015-02-27T00:02:33+5:30

जिल्ह्यात होळीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती दारूबंदी विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. यावरून त्यांनी सापळा रचून...

Police arrested the liquor vendors in the car | नागपूरातील दारूविक्रेत्यांना कारसह अटक

नागपूरातील दारूविक्रेत्यांना कारसह अटक

वर्धा : जिल्ह्यात होळीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती दारूबंदी विशेष पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. यावरून त्यांनी सापळा रचून दयालनगर येथे कारवाई करीत वर्धेतील दोन दारूविक्रेत्यांसह नागपूर येथील दोघांना अटक केली. या दोन्ही कारवाईत ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांत केशव संगतानी, मनीष बोटवाणी दोन्ही रा. दयालनगर व करण मोटवाणी, देवीदास देवाणी दोन्ही रा. जरीपटका नागपूर या चार जणांना समावेश आहे. या दोन्ही प्रकरणात सेवाग्राम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, संजय मांते, अशोक साबळे, दिनेश तुमाने, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, संतोष जयस्वाल, राजेश पचारे, अमरदिप पाटील, नितेश वैद्य यांनी केली.( प्रतिनिधी)

Web Title: Police arrested the liquor vendors in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.