शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'पीएम' उद्या वर्ध्यात; शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:23 IST

जड वाहनांना शहरात असणार प्रवेशबंदी : वाहतुकीच्या मार्गातही केलाय बदल, शहरातील मैदानांवर वाहनतळ निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र शासनाच्या पी. एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २० सप्टेंबरला स्वावलंबी मैदानात होणार आहे. त्याकरिता शहरात तगड़ी सुरक्षा व्यवस्था राहणार असून, शहरातील वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. तसेच वाहनतळांचीही निश्चिती करण्यात आली आहे, याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी सकाळी ६:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अचाधित राहावी, म्हणून सभास्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तसेच पार्किंगस्थळाकडे जाणारा मार्ग कार्यक्रमाकरिता येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांकरिता रहदारी मार्गात बदल करण्यात आला आहे. जड वाहनांना शहरामध्ये प्रवेशबंदी केली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने व अतिमहत्वाच्या सेवा देणाऱ्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. 

सभेकरिता शहरातील बाहन पार्किया स्थळे स्वावलंबी डीएड कॉलेज मैदान व जगजीवन राम शाळेसमोरील मैदान, सर्कस ग्राऊंड रामनगर व शितला माता ग्राउंड येथे व्हीआयपी यांच्या वाहना करिता पार्किंग, जे. बी. सायन्स कॉलेज मैदान, इदगाह मैदान, कोचर महान गणे- शनगर, यशवंत जिनिंग ग्राउंड, मॉडेल हायस्कूल ग्राउंड शिवनगर येथे बसेस व ट्रॅव्हल्सकरिता पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिदी (मेघे) ग्रामपंचायत ग्राउंडवर चारचाकी वाहना- करिता, अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज, रामनगर येथे दुचाकी वाहनासाठी, संत तुकडोजी शाळा मैदान व पोलिस स्टेशन, रामनगर मैदान येथे पोलिस वाहनां करिता, न्यू इंग्लिश शाळा मैदान व केसरीमल कन्या शाळा मैदान वैथे शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिक यांच्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीकरिता हे मार्ग असणार बंद सेवाग्राम चौक ते गांधी पुतळा शासकीय रेस्ट हाऊस, आरती चौक, धुनीवाला मठ, न्यू आर्टस कॉलेज, आर्वी नाका, पावडे चौककडून येणाऱ्या वाहतुकीस मज्जाव केला आहे. 

जुनापाणी चौक ते आर्वी नाका संचलर रोडमार्गे पावडे चौक येणाऱ्याा वाहतुकीस मज्जाव, स्वावलंबी मैदान (सभास्थळ), संत तुकडोजी मैदान (हेलीपॅड) सभोवताली २०० मीटरपर्यंत येणाच्या सर्व मार्गावर मज्जाव करण्यात आला आहे. बजाज चौक, शास्त्री चौक, बॅचलर रोड मार्गे स्वावलंबी मैदानाकडे येणारे मार्ग, स्वावलंबी मैदान, संत तुकडोजी महाराज मैदान सभोवताली २०० मीटरपर्यंत व आर्थी नाका ते शास्त्री चौकापर्यंत बॅचलर रोड नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे.

या मार्गात बदल हिंगणघाट, समुद्रपूर या परिस रातील वाहतूक जाम चौरस्ता मार्गे हिंगणघाट, धोतरा, वायगाव चौरस्ता, सेलू काटे, बोरगावमार्गे वर्धा येथे येईल. शेडगाव फाटामार्गे येणारी वाहतूक सेवाग्राम चौक, बापू कुटी, नांदोरा, मांडवगड टी पाँडेट, आष्ठा, भुगाव. सेलू काटे रोड, बौरगाचमार्गे वर्धेकडे येईल, तसेच कारंजा, आष्टी, सेलू परिसरातून येणारी वाहतूक साटोडा टी पॉइंट, कारला टी पॉइंट, जुनापाणी चौक उड्डाणपूल, हिंदी विश्वविद्यालय उड्डाणपूल, शांतीनगर उहाणपूल, नागठाणा टी पछींट, सावंगी टी पॉइंट, देवळी नाका दयालनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती यामार्गे वर्धा शहराकडे येतील. 

'नो फ्लाय झोन' घोषित 

  • पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त २० सप्टेंबर रोजी स्वावलंबी मैदान सभास्थळ व सर्व हेलीपॅडच्या सभोवताली दोन किलोमीटर परिसरात ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने, पैराग्लायडर, पॅरामोटर्स, हैंडग्लायर्डर्स आदींचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला आहे. 
  • स्वावलंबी मैदान येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे सभास्थळ आणि हेलीपेंड परिसर नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कडींले यांनी दिला आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwardha-acवर्धा