शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी विमा योजनेत सेवामूल्याच्या नावावर लूट

By admin | Updated: July 27, 2014 23:53 IST

दरवर्षीप्रमाणे शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या आम आदमी विमा योजनेंतर्गत शाळांतून विद्यार्थ्यांना योजनेचा शैक्षणिक लाभ मिळवून देण्याकरिता नोंदणी केली जाते. ही नोंदणी करताना काही

तळेगाव (श्या़पं़) : दरवर्षीप्रमाणे शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या आम आदमी विमा योजनेंतर्गत शाळांतून विद्यार्थ्यांना योजनेचा शैक्षणिक लाभ मिळवून देण्याकरिता नोंदणी केली जाते. ही नोंदणी करताना काही शाळांत नोंदणीच्या नावावर दुप्पट सेवामूल्य आकारले जात असल्याचे समोर आले आहे. यातून सामान्यांची लूट केली जात आहे़शासन भूमिहिन व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे़ २००७-०८ पासून सुरू झालेल्या आम आदमी विमा योजनेतही त्यांचा सहभाग आहे. या योजनेत इयत्ता नऊ ते बारावीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना, ज्यांचे पालक भूमिहिन, शेतमजूर, एक हेक्टर बागायती, २ हेक्टर कोरडवाहू क्षेत्र धारण करीत असेल, अशा विद्यार्थ्यांना १० महिन्यांपर्यंत १०० रुपये प्रतिमाह शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेकरिता लाभार्थ्यांकडून २० व २२.५० रुपये सेवामूल्य घेण्यात यावे, असा शासननिर्णय आहे; पण तालुक्यातील काही शाळांमध्ये ेविद्यार्थ्यांकडून दुप्पट रक्कम आकारली जात असल्याचे दिनर्शनास आले आहे. महाआॅनलाईनने यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात अंदाजे ३६ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या पुढील टप्पा ३६ लाख लाभार्थ्यांची माहिती अपडेट करणे आहे. यात प्रत्येक लाभार्थ्याकरिता २० ते २२ रुपये ५० पैसे सेवामूल्य घ्यायचे आहे़ अनेक शाळांत ४० रुपये आकारले जात आहेत़ यामुळे लाभार्थ्यांची लूट होत असल्याचे दिसते़शासन सामान्यांच्या हितासाठी योजना राबविते; पण त्या राबविणाऱ्या यंत्रणा योजनांचा बट्ट्याबोळ करीत असल्याचे दिसते़ शासन विवरणपत्र ५ व ६ मध्ये सेवामूल्य २० ते २२़५० रुपये घेण्याचे स्पष्ट निर्देश असताना दुप्पट रक्कम का घेतली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ सामान्यांच्या लुटीस जबाबदार कोण, शाळा की, ई-सेतू केंद्र, असा प्रश्नही उपस्थित आहे़ या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे़(वार्ताहर)