शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

धुऱ्यावर तणनाशक फवारल्याने कपाशी धोक्यात

By admin | Updated: September 24, 2015 02:42 IST

तणनाशकाचे दुष्परिणाम किती भयानक होतात, याचा अनुभव शेतकरी श्रीधर नासरे यांना आला आहे.

पिके पडली पिवळी : मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची पाहणीविरूळ (आ.) : तणनाशकाचे दुष्परिणाम किती भयानक होतात, याचा अनुभव शेतकरी श्रीधर नासरे यांना आला आहे. धुऱ्यालगत असलेल्या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात धुऱ्यावर तणनाशक फवारल्याने त्यांच्या शेतातील नऊ एकर कपाशीचे पीक धोक्यात आले आहे.श्रीधर नासरे यांनी मनीषा डोईजड यांच्या मालकीचे नऊ एकर शेत मक्त्याने केले आहे. नऊ एकरातील कपाशीचे पीक चांगले आले असताना बाजूच्या शेतकऱ्याने धुऱ्यावर तणनाशक फवारले. हवा असल्याने हा फवारा नासरे यांच्या कपाशी पिकावर उडाला. यामुळे त्यांची नऊ एकरातील कपाशीचे संपूण पीक खराब होऊन धोक्यात आले आहे. कपाशीचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी अनेकांचे मार्गदर्शन घेऊन फवारणी केली; पण कपाशीच्या पिकात सुधारणा झाली नाही. याबबात त्यांनी कृषी विभागाला कळविले. यावरून मंडळ कृषी अधिकारी प्रमोद खेडकर, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील डॉ. दवणे यांनी सदर शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाने सूचविलेल्या उपाययोजना नासरे करीत आहेत; पण पिकांमध्ये सुधारणा दिसत नसल्याने त्यांना नुकसान सोसावे लागणार असल्याचेच दिसते. शेतकऱ्यांनी पिकांवर तणनाशकाची फवारणी करताना काळजी घेणेच गरजेचे झाले आहे. यासाठी उपाययोजना सुचविणे गरजेचे आहे.(वार्ताहर)