शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामातील प्लाझ्मा थेरपीचा प्रस्ताव दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासल्यानंतर त्या रुग्णाच्या रक्तात आजाराच्या विषाणूची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके संधोधनाकरिता तसेच इतर रुग्णांना आजारमुक्त करण्यासाठी उपयोगात पडतात. याच प्रतिजैविकांचा म्हणजेच प्लाज्माचा वापर विविध आजारांतील अतिगंभीर रुग्णावर केल्या जातो. सध्याच्या कोरोनाप्रकोपाने राज्यासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढविली असून दिवसेंदिवस आकडा फुगत आहे.

ठळक मुद्देमंजुरीची प्रतीक्षा : उपचाराकरिता कस्तुरबा रुग्णालय सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ विषाणूच्या प्रकोपकाळात ‘प्लाझ्मा थेरपी’ महत्त्वाची ठरु लागली आहे. रोगमुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरिरात निर्माण होणारी प्रतिजैविके इतर रुग्णांच्या उपचाराकरिता महत्त्वाची ठरत असल्याचे ‘प्लाझ्मा थेरपी’ चा वापर केल्या जातो. याकरिता सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयही सज्ज असून दिल्लीत मान्यतेकरिता प्रस्ताव पाठविला आहे. आता या प्रस्तावाला मान्यता मिळताच सेवाग्राम रुग्णालयातही ही उपचार पद्धती सुुरु केली जाणार आहे.व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासल्यानंतर त्या रुग्णाच्या रक्तात आजाराच्या विषाणूची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके संधोधनाकरिता तसेच इतर रुग्णांना आजारमुक्त करण्यासाठी उपयोगात पडतात. याच प्रतिजैविकांचा म्हणजेच प्लाज्माचा वापर विविध आजारांतील अतिगंभीर रुग्णावर केल्या जातो. सध्याच्या कोरोनाप्रकोपाने राज्यासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढविली असून दिवसेंदिवस आकडा फुगत आहे. अद्यापही कोरोनावर प्रभावी औषधी किंवा लसही सापडली नसल्याने अनेक ठिकाणी ‘प्लाज्मा थेरपी’ च्या वापरावर भर दिल्या जात आहे. आता कोविड सेंटर असलेल्या तसेच जगभरात नावलौकीक असलेल्या सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात देखील ‘प्लाझ्मा थेरपी’ चा अवलंब करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. याकरिता प्रयोगशाळा तयार केली असून रुग्णालयाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे मान्यतेसाठी प्रस्तावही पाठविला आहे. आता आयुर्विज्ञान संस्थेच्या मान्यतेची प्रतीक्षा असून मान्यता मिळाली तर सेवाग्राममध्येही ‘प्लाझ्मा थेरपी’ या पद्धतीचा अवलंब केल्या जाणार आहे.उपचारपद्धतीकरिता चाचण्यांची गरजप्लाज्मा दान करण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात केले जात आहे पण, प्लाझ्मा कुणाच्याही शरिरातून काढला जात नाही. त्यासाठी पूर्वी प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीच्या चाचण्या केल्या जातात. त्यानंतरच प्लाझ्मा घेण्याबाबत वैद्यकीय अधिकारी निर्णय घेत असतात. ज्या आजारातून रुग्ण पूर्णत: बरा होऊन बाहेर येतो, त्याच्या शरीरात त्या रोगाशी लढणारी प्रतिजैविके तयार होते. ही प्रतिजैविके गरजू रुग्णास दिल्यास तो रुग्ण लवकर बरा होतो.सेवाग्राम रु ग्णालयात प्लाझ्मा थेरपीकरिता सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याकरिता येथे स्वतंत्र प्रयोगशाळाही तयार करण्यात आली असून याच्या मान्यतेकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची प्रतीक्षा असून मान्यता मिळताच उपचार पद्धती सुरु केली जाईल.डॉ. नितीन गगणे, अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या