शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता अनुदानातील १.१५ कोटींच्या कामांच्या स्थगितीची याचिका फेटाळली

By admin | Updated: January 28, 2015 23:37 IST

जिल्हाधिकारी यांनी हिंगणघाट नगरपरिषदेतील रस्ता अनुदानाअंतर्गत १ कोटी १५ लाख रक्कमेचा विकास कामांना स्थगिती देण्यासंबंधिची याचिका फेटाळली. यामुळे शहरातील विकास

हिंगणघाट: जिल्हाधिकारी यांनी हिंगणघाट नगरपरिषदेतील रस्ता अनुदानाअंतर्गत १ कोटी १५ लाख रक्कमेचा विकास कामांना स्थगिती देण्यासंबंधिची याचिका फेटाळली. यामुळे शहरातील विकास कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी दिली. यासंदर्भात प्रशांत दादा पुसदेकर रा. हिंगणघाट यांनी याचिका दाखल केली होती. हिंगणघाट नगरपालिकेने १८ जानेवारी २०१४ च्या सर्वसाधारण सभेत ‘नागरी दलीत वस्ती, रस्ता अनुदान व वैशिष्टपूर्ण अनुदान २०१३-१४ अंतर्गत प्राप्त झालेल्या व होणाऱ्या निधीतून कामाची निवड करण्यासंदर्भात हा विषय क्रमांक ३ बहुमताने पारीत करीत कामाची निवड करण्याचे अधिकार नगराध्यक्षांना प्रदान करण्यात आले होते.त्यानुसार २९ फेबु्रवारी २०१४ रोजी नगरपरिषदेने निविदा सुद्धा प्रकाशित केली; परंतु नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत पारीत केलेला ठराव हा नगरपालिका अधिनियमाचे उल्लंघन करणारा असून त्याला स्थगिती मिळण्यात यावी, अशा स्वरुपाची याचिका प्रशांत पुसदेकर यांनी १८ मार्च २०१४ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली. ही याचिका फेटाळली. जिल्हाधिकाऱ्यांनी बाजु ऐकून न घेता याचिका फेटाळली. त्यामुळे ही बाब अन्यायकारक असून रस्ता विकास कामाना स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल करण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेऊनच निर्णय देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेवून याचिका रद्द करीत असल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे तब्बल ११ महिन्यांपासून प्रलंबित रस्ता अनुदानांतर्गत १.१५ कोटी रक्कमेच्या विकास कामाचा मार्ग मोकळा झाला. पालिकेच्यावतीने अ‍ॅड. पी.बी.टावरी व अ‍ॅड. गिरीश तकवाले यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)