२़८० लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
By Admin | Updated: February 9, 2015 23:17 IST2015-02-09T23:17:55+5:302015-02-09T23:17:55+5:30
भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील ६८ टक्के बालकांत आतड्याचा कृमी दोष आढळतो़ हा मातीतून प्रसारित जंतामुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष होण्याची शक्यता असते.

२़८० लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
वर्धा : भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील ६८ टक्के बालकांत आतड्याचा कृमी दोष आढळतो़ हा मातीतून प्रसारित जंतामुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष होण्याची शक्यता असते. यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेत जिल्ह्यात २ लाख ८० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे़
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता नागपूर विभागातून वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे़ यात वय वर्ष १ ते १९ च्या शासकीय, अनुदानीत शाळा, अंगणवाड्या व शाळाबाह्य मुलांना जंतनाशक गोळ्यांची मात्रा देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार ५४७ लाभार्थ्यांचा यात समावेश होईल़ जंतनाशक गोळी जेवण झाल्यानंतर घ्यायची असून काही दुष्परिणाम आढल्यास प्राथमिक आरोग्य केंद, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत संपर्क साधावा़ आरोग्य विभागाच्या सहकार्याने जंतनाशक ‘अल्वेडाझोल’ गोळी देऊन आरोग्य, पोषणस्थिती व शिक्षणांचा दर्जा उंचावणे, हा उद्देश आहे. सुटलेल्या मुलांना १३ फेब्रुवारी रोजी गोळी दिली जाईल़ आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)