पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची
By Admin | Updated: July 3, 2015 02:34 IST2015-07-03T02:34:47+5:302015-07-03T02:34:47+5:30
खरीप हंगामात शासनाकडून जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची

पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची
वर्धा : खरीप हंगामात शासनाकडून जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांनी केले आहे.
जिल्ह्यात खरीपात ज्वारी, सोयाबीन, तूर व कापूस पिकांकरिता संपूर्ण तालुके तर खरीपातील भुईमुग पिकांकरिता आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्याची निवड केली आहे. यासह भूईमूग, मूग, उडीद व तीळ पिके आर्वी तालुक्याकरिता व ऊस पूर्व हंगामी व ऊस खोडवा पिकांकरिता आर्वी, वर्धा, सेलू, देवळी व ऊस सुरूकरिता आर्वी, वर्धा सेलू व समुद्रपूर चार तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे.
पीक विमा योजनेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विमा हप्ता दरात अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना ५० टक्के सर्व पिके व कापूस पिकांसाठी अल्प, अत्यल्प शेतकरी ७५ टक्के व इतर शेतकरी यांना ५० टक्के विशेष सूट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अधिसूचित तालुका पीक व अधिसूचित मंडळे याची यादी संबंधित तालुका अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१५ यापैकी जी आधी असेल त्या तारखेच्या आत सहभागी व्हायचे आहे. पूर्व हंगामी ऊस पिकांसाठी लागणीपासून एक महिना किंवा ३१ डिसेंबर २०१५ तसेच ऊस खोडवाकरिता ३१ मे २०१६ व सुरू ऊसाकरिता ३१ मार्च २०१६ पर्यंत सहभागी व्हायचे आहे. चक्रीवादळ, पूर, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे. त्या संबंधित वित्तीय संस्थेस नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती नुकसानीचे कारण व प्रमाण परिस्थितीत नुकसान अधिसूचित पिकाची माहिती नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल कार्यलयाच्य मदतीने नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)