२१ कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:39+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओम्बासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपळाके यांच्या नेतृत्वात तीन पथक तयार केले. यातील दोन पथकाने कारंजा, आष्टी, समुद्रपूर व हिंगणघाट पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावर भेटी दिल्या असता जवळपास २१ कर्मचारी मुख्यालयी दांडी मारत असल्याचे निदर्शनास आले.

२१ कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखली
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना आपत्तीकाळात सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाºयांनी मुख्यालयी राहावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते. तरीही या आदेशाला डावलून मुख्यालयी दांडी मारणाऱ्या चार पंचायत समितीतील २१ अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. या सर्वांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश पारित करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित जिल्ह्यातून ये-जा करीत असल्याबाबत लोकमतने ‘स्टींग आॅपरेशन’ केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाईला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रत्येक पंचायत समितीअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा मुख्यालयाचा पत्ता मागितला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओम्बासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपळाके यांच्या नेतृत्वात तीन पथक तयार केले. यातील दोन पथकाने कारंजा, आष्टी, समुद्रपूर व हिंगणघाट पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावर भेटी दिल्या असता जवळपास २१ कर्मचारी मुख्यालयी दांडी मारत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे यातील २० कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ तर आष्टी पचायत समितीत ग्रामसेवक पाठक यांची दोन वर्षाकरिता वेतनवाढ रोखण्याचा आदेश दिला आहे.
पंचायत समितीनिहाय कर्मचारी
कारंजा: तालुका आरोग्य अधिकारी एस.एम.रंगारी, स्थापत्य अभियंता सहाय्यक यु.एच.दंदे, विस्तार अधिकारी सांख्यिकी एल.जी.भोंबे, पर्यवेक्षिका रंजना जवादे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कांबळे, वरिष्ठ सहाय्यक वाय.ए.दरणे, हिवताप आरोग्य सहाय्यक टी.एम.राठोड, आरोग्य सहाय्यक घनश्याम जिवतोडे.
आष्टी : ग्रामसेवक एम.व्ही.पाठक (पुनसे),ग्रामसेवक आर.व्ही.खेरडे, ग्रामसेवक बी.जी.गवई, ग्रामसेवक ए.डी.उतखेडे, ग्रामसेवक काशीनाथ शेकापुरे, कनिष्ठ सहाय्यक लक्ष्मी फोडेकर, कनिष्ठ सहाय्यक यु.जे.कदम, पर्यवेक्षिका आरती चिकाटे.
समुद्रपूर : पशुधन पर्यवेक्षक प्रितमकुमार दडमल, वरिष्ठ सहाय्यक प्रशांत मंडपे, कनिष्ठ सहाय्यक एस.बी.लोहकरे.
हिंगणघाट: शालेश पोषण आहार अधीक्षक वर्ग-२ प्रभा दुपारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे पी.एन.कुंभारे.
यापूर्वी आठ अधिकाऱ्यांवर कारवाई
उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्या पथकाने सेलू पंचायत समिती तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांच्या पथकाने देवळी पंचायत समितीमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावर भेटी दिल्या होत्या. त्यादरम्यान सेलुतील सहाय्यक प्रशासन अधिकारी सुनील लोखंडे, कनिष्ठ लेखा अधिकारी राजेश पुसनाके, प्रभारी बालविकास अधिकारी ज्योती सोनवने, एबीविसेयो प्रकल्पाचे कनिष्ठ सहाय्यक राजेश शिरसकर तर देवळीतील ए.बा.वि.से.यो. च्या पर्यवेक्षिका आर.एन.गोरे, सहाय्यक स्थापत्य अभियंता एन.एम.सालवकर, बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता लोकेश रघाटाटे व पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक राजेश सयाम हे मुख्यालयी नव्हते. त्यामुळे यांचेही वेतन वाढ रोखण्याचा आदेश सीईओंनी दिला होता.
आठही पंचायत समितीमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी ज्यांच्याकडे वास्तव्यास आहे, त्या ठिकाणचा पत्ता व सर्वांचे मोबाईल क्रमांक मागितले होते. त्यानुसार नियुक्त केलेल्या पथकाव्दारे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली. तेव्हा चार तालुक्यातील २१ कर्मचारी मुख्यालयी नसल्याचे दिसून आहे. त्यामुहे त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. वर्धा.